एएफडीची पुणे मेट्रो प्रकल्पाला भेट | पुढारी

एएफडीची पुणे मेट्रो प्रकल्पाला भेट

पुणे : पुणे मेट्रोची फंडिंग एजन्सी असलेल्या एएफडीने मेट्रोच्या पुण्यात सुरू असलेल्या कामांना भेट दिली. यात मेट्रोचे पूर्ण झालेल्या गरवारे स्थानकासह सर्वच कामांची एएफडीच्या अधिकार्‍यांनी पाहणी केली. एएफडीने पुणे मेट्रोच्या पुण्यातील प्रकल्पाला कर्ज दिले आहे.

त्यामुळे एजन्सीच्या अधिकार्‍यांनी पाहणी करून कामाचा आढावा घेतला. एएफडी फ्रान्सने प्रकल्पासाठी रीच 3 वायडक्ट, ट्रॅक्शन आणि ऑक्झिलरी पॉवर सप्लाय, सिग्नलिंग, टेलिकॉम, लिफ्ट्स आणि एस्केलेटर, पर्यावरण नियंत्रण प्रणाली, टनेल व्हेंटिलेशन सिस्टम आणि रेलसाठी निधी दिला आहे.

 

Back to top button