Errol Musk : एलन मस्कच्या वडिलांना मिळालीय शुक्राणू दान करण्याची ऑफर | पुढारी

Errol Musk : एलन मस्कच्या वडिलांना मिळालीय शुक्राणू दान करण्याची ऑफर

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क नेहमीच चर्चेत असतात. ट्विटर कंपनीसोबत झालेल्या वादाच्या बातम्या असो किंवा आणखी काही तो मीडियामध्ये नेहमीच चर्चेत असतात. आता एलन मस्कचे वडील एरोल (Errol Musk) चांगलेच चर्चेत आले आहेत. चक्क शुक्राणू दान करण्याची ऑफर मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे. (Errol Musk)

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, ७६ वर्षीय एरोल मस्क यांनी दावा केला आहे की, त्यांना एलन मस्कची नवीन पिढी तयार करण्यासाठी शुक्राणू दान करण्याची ऑफर मिळालीय. ते म्हणाले की, त्याला कोलंबियन कंपनीकडून ही ऑफर मिळाली आहे, जी त्यांना उच्च वर्गातील कोलंबियन महिलांच्या प्रेग्नेंसीसाठी आपले शुक्राणू दान करायचे आहे. एरोल मस्क यांनी असेही म्हटले आहे की, त्यांना कंपनीकडून सांगण्यात आले होते की, एलन मस्कची निर्मिती करणारी एकमेव व्यक्ती जगात असताना स्पर्मसाठी एलन मस्ककडे का जावे?

शुक्राणू देण्याच्या बदल्यात ‘ही’ ऑफर

मस्क यांनी असेही म्हटले आहे की, त्यांना कोणतेही पैसे मिळतील, असे सांगण्यात आले नव्हते. त्यांना एवढेच सांगण्यात आले की जर त्यांनी त्यांचे शुक्राणू दान करण्यास सहमती दर्शवली तर त्यांना इतर अनेक सुविधा दिल्या जातील.

एरॉल मस्क यांनी हे दिले उत्तर

एलन मस्कच्या वडिलांनी म्हटले की, शुक्राणू दान करण्याच्या बदल्यात त्यांना फर्स्ट क्लास प्रवास आणि फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहण्याची ऑफर देण्यात आली होती. या सुविधांच्या बदल्यात ते शुक्राणू दान करण्यास तयार आहेत का, असे विचारले असता? त्याने उत्तर दिले, ‘का नाही?’

Back to top button