पुणे : मोबाईल चोराला बेड्या | पुढारी

पुणे : मोबाईल चोराला बेड्या

पुणे : सायकलस्वार तरुणालाचा मोबाईल हिसकावून नेत पुण्याच्या दिशेने पळून जाणार्‍या दुचाकीवरील तिघांपैकी एकाला गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली. त्याच्याकडून 65 हजार रुपयांचा एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे. रूपेश मनोज क्षीरसागर (रा. भवानी पेठ), असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

क्षीरसागर हा मोबाईल बिल नसताना आयफोन विक्री करण्यासाठी विनय हायस्कूलसमोर उभा असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप भोसले, उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, संजय गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Back to top button