Tehran movie : जॉन अब्राहमच्या 'तेहरान'चा टीझर रिलीज (Video) | पुढारी

Tehran movie : जॉन अब्राहमच्या 'तेहरान'चा टीझर रिलीज (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमचा आगामी चित्रपट ‘तेहरान’चा टीझर (Tehran movie) रिलीज झाला आहे. या फर्स्ट लूकचा टीझर रिलीज करून जॉनने चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केल्याची घोषणा केली आहे. बॉलीवूडमध्ये ‘बदलापूर’, ‘स्त्री’ आणि ‘मिमी’ सारखे सुपरहिट चित्रपट देणाऱ्या मॅडॉक फिल्म्सने जॉन अब्राहमच्या मुख्य भूमिकेतील ‘तेहरान’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक टिझर रिलीज केलाय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. (Tehran movie)

जॉननेही टीझर शेअर केला आहे. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे. आपल्या इन्स्टाग्रामवर चित्रपटाचा तेहरान फर्स्ट लूक शेअर करताना जॉन अब्राहमने लिहिले, ” लाईट्स, कॅमेरा, काही ॲक्शनसाठी वेळ. तेहरानचे शूटिंग सुरू होते. टीझर पहा”

जॉन अब्राहमची मुख्य भूमिका असलेला चित्रपट अरुण गोपालन यांनी दिग्दर्शित केला आहे. तसेच दिनेश विजन यांची निर्मिती आहे. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर जॉन अब्राहम शेवटचा ‘ॲटॅक’ या चित्रपटात दिसला होता. तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. आता तो लवकरच अर्जुन कपूर, तारा सुतारिया आणि दिशा पटानीसोबत ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तो शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटातही दिसणार आहे.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by John Abraham (@thejohnabraham)

Back to top button