Bharti Singh : कॉमेडियन भारती सिंहने दाखविली बाळाची झलक | पुढारी

Bharti Singh : कॉमेडियन भारती सिंहने दाखविली बाळाची झलक

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह ( Bharti Singh ) आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या घरी काही दिवसांपुर्वी एका लहान बाळाचे आगमन झाले. यानंतर भारती आणि हर्ष लिंबाचिया याचा आनंद गगनात मावेना. परंतु, सोशल मीडियावर चाहते भारतीच्या मुलाची एक झलक पाहण्यास चाहते आतुरतेने वाट होते. याच दरम्यान भारतीने पहिल्यादा तिच्या मुलाची पहिली झलक दाखविली आहे. याआधी भारतीने तिच्या बाळाचे नाव गोला उर्फ लक्ष्य ठेवल्याचे सांगितले होते.

भारती सिंहने ( Bharti Singh ) नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या बाळासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत खास करून भारतीच्या बाळाचा चेहरा स्पष्टपणे दिसत आहेत. याआधी भारतीने बाळाचे नाव गोला उर्फ लक्ष्य ठेवल्याचे सांगतानादेखील एका फोटो शेअर केला होता. परंतु, या फोटोत तिचे बाळ स्पष्टपणे दिसत नव्हते. भारती आई झाल्याची माहिती सोशल मीडियावर मिळताच चाहत्यानी भरभरून कौतुक केले. यानंतर चाहते तिच्या बाळाची झलक पाहण्यास आतुरतेने वाट पाहत होते. यानंतर तिने सध्या गोला उर्फ लक्ष्यची झलक दाखविली आहे.

भारतीने यूट्यूब चॅनलवर तिचा, पती लिंबाचिया आणि मुलगा लक्ष्यचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यावेळी तिने गोलूसाठी आकर्षक सजावट केलेली त्याची रूम दाखविली आहे. यावेळी भारतीने आज चाहत्यांना गोलूची पहिली झलक पाहायला मिळणार असल्याचे सांगितले आहे.

हर्ष लिंबाचिया आणि भारती सिंह यांचा विवाह ३ डिसेंबर २०१७ रोजी झाला होता. भारती सिंहने ३ एप्रिल २०२२ रोजी चाहत्यांना  गुडन्यूज दिली होती. काही दिवसांपुूर्वी भारती आणि हर्षने आपल्या मुलाचे नाव ‘लक्ष्य’ ठेवल्याचे सांगितले होते.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Bharti Singh (@bharti.laughterqueen)

 

View this post on Instagram

 

A post shared by Bharti Singh (@bharti.laughterqueen)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Back to top button