पिंपरी : विद्यार्थ्यांना मिळणार कोविड विमा कवच

पिंपरी : विद्यार्थ्यांना मिळणार कोविड विमा कवच

पिंपरी : गरीब विद्यार्थ्यांना कोविड उपचारासाठी कोविड विमा कवच उपलब्ध करून देण्याच्या कॉप्स विद्यार्थी संघटनेच्या मागणीला तब्बल एक वर्षानंतर यश आले. राज्यात आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर त्याचा सामना करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून अल्पस्वरूपातील रक्कम आपत्कालीन निधी म्हणून गोळा केली जाते. हा निधी गोळा करून विद्यापीठाने स्वतंत्रपणे मुदत ठेवीत ठेवणे अपेक्षित असते. गेल्या दोन वर्षांत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थ्यांवर कोविडचा आघात झाला असून, आता त्यांच्या उपचारासाठी आवश्यक आर्थिक परिस्थिती नसल्याने अनेकांना शिक्षण अर्ध्यावर सोडून काम शोधण्याची वेळ आली आहे.

तरीही नवीन शैक्षणिक वर्षाच्या दृष्टीने किमान राज्यातील विद्यार्थी आणि त्याचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी राज्यातील सर्व विद्यापीठात शिकणार्‍या विद्यार्थ्यांना संबधित विद्यापीठाच्या कुलगुरूंनी विद्यापीठ आपत्कालीन निधीमधून गरीब विद्यार्थ्यांना कोविड उपचारासाठी कोविड विमा कवच उपलब्ध करून देण्याची मागणी कॉप्स विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमर एकाड यांनी उच्च व तंत्र शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, कला संचालनालय, आयुष, महाराष्ट्र पशु व मत्स विज्ञान विद्यापीठ, नागपूर व कुलसचिव सर्व कृषी, अकृषी, खासगी व अभिमत विद्यापीठ यांच्याकडे केली आहे. हे प्रकरण कार्यवाहीसाठी सर्व अकृषी विद्यापीठे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे यांना डॉ. गोविंद संगवई सहा. संचालक, तंत्रशिक्षण महाराष्ट्र राज्य यांनी पाठविले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news