

पुढारी ऑनलाईन डेस्क :
चित्रपट निर्माती, कवयित्री दिग्दर्शक लीना मणिमेकलाई ( Leena Manimekalai ) यांनी आपल्या ट्विटरवर एक पोस्टर शेअर केल्याने त्यांच्यावर जोरदार टीका होतेय. कारण Leena Manimekalai यांनी शेअर केलेल्या पोस्टरवर कालीमाता (KAALI ) अवतारातील चित्र आहे. पण, या पोस्टरमधून कालीमातेचा अपमान झाला असून भावना दुखावल्याचा आरोप अनेक नेटकऱ्यांनी केला आहे. (KAALI )
लिना मणीमेकल या भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्मात्या आहेत. त्यांच्या काली हा माहितीपट येतोय. पया माहितीचे पोस्टरवर असे काही चित्र आहे की, त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. लिना यांनी सोशल मीडियावर या माहितीपटाचं पोस्टर शेअर केलंय. ऱ्हिदम्स ऑफ कॅनडा नावाच्या कार्यक्रमात हे पोस्टर लॉन्च करण्यात आलं आहे. या माहितीपटाचं काली असं नाव आहे. हे पोस्टर पाहून अनेक नेटकऱ्यांनी सोशल मीडियावरुन संताप व्यक्त केला जाताेय.
अनेक सोशल मीडिया युजर्सनी लिना यांच्या ट्विटवर कमेंट्स केले आहेत. काही जणांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे तर काहींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. एका युजरने म्हटलंय- हे आक्षेपार्ह पोस्टर आहे, त्वरित काढून टाका तर दुसऱ्या युजरने म्हटलं आहे-डिजिटल माध्यमांवर हे कसं प्रकाशित होऊ दिलं, असे असंख्य कमेंट्स पाहायला मिळताहेत.
हेही वाचा :