नुपूर शर्मांवरील ट्वीट अखिलेश यादवांना पडणार महागात, महिला आयोगाने घेतली गंभीर दखल | पुढारी

नुपूर शर्मांवरील ट्वीट अखिलेश यादवांना पडणार महागात, महिला आयोगाने घेतली गंभीर दखल

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
भाजपच्‍या माजी प्रवक्‍त्‍या नुपूर शर्मा यांच्‍यावर वादग्रस्‍त  ट्वीट करणे समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांना महागात पडणार आहे. या  ट्वीटची राष्‍ट्रीय महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. अखिलेश यादव यांच्‍या कडक कारवाई करावी, असा आदेश राष्‍ट्रीय महिला आयोगाने दिले आहेत.

याप्रकरणी राष्‍ट्रीय महिला आयोगाच्‍या अध्‍यक्षा रेखा शर्मा यांनी उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालकांना पत्र पाठवले आहे. अखिलेश यादव यांनी केलेले  ट्वीटप्रकरणी चौकशी निष्‍पक्षपणे करावी. तसेच याप्रकरणी अखिलेश यादव यांच्‍यावर करण्‍यात आलेल्‍या कारवाईची तीन दिवसांमध्‍ये माहिती दयावी, असे या पत्रात नमूद केले आहे.

अखिलेश यादव यांचे  ट्वीट प्रक्षोभक आहे. ते महिलांविरोधात असून यामुळे नुपूर शर्मा यांच्‍याविरोधात लोकांना भडकविण्‍याचे काम होत आहे, असेही निरीक्षण राष्‍ट्रीय महिला आयोगाच्‍या अध्‍यक्षा रेखा शर्मा यांनी पत्रात नोंदवले आहे. वादग्रस्‍त विधान प्रकरणी सर्वोच्‍च न्‍यायालयाने नुकतेच नुपूर शर्मा यांना पटकारले होते. तसेच नुपूर शर्मा यांनी वादग्रस्‍त विधानावर माफी मागावी, असेही न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले होते.

हेही वाचा : 

Back to top button