सुष्मिता सेनच्या भावाचा संसार घटस्फोटापर्यंत पोहोचला, इंटिमेट फोटोंवरून वाद विकोपाला? | पुढारी

सुष्मिता सेनच्या भावाचा संसार घटस्फोटापर्यंत पोहोचला, इंटिमेट फोटोंवरून वाद विकोपाला?

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन आणि वहिनी चारू असोपा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा पुन्हा एकदा रंगू लागल्या आहेत. राजीव सेन आणि चारू याचे लग्न झाल्यापासून दोघांच्यात कौटूबिक वाद होत होते. परंतु यावेळेचा हा वाद इंटिमेट फोटोंवरून विकोपाला गेला आहे. यामुळे राजीव आणि चारू हे दोघेजण लवकरच घटस्फोट घेणार का? यांची उत्सुकता चाहत्यांना लागून राहिली आहे.

राजीव आणि चारू असोपा यांनी पहिल्यांदा ७ जून २०१९ रोजी कोर्ट मॉरेज केलं होतं. यानंतर दोघांनी गोव्यात बंगाली आणि राजस्थानी रितीरिवाजांनुसार १६ जून रोजी लग्न केले. या विवाह सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन, रोहमन शॉलसोबत काही जवळचे कुटुंबीय उपस्थित होते. हा लग्न सोहळा धुमधड्याक्यात पार पडला. दोघांना सध्या एक मुलगीदेखील आहे.

इंटिमेट फोटोंवरून वाद

लग्नानंतर राजीवने त्याच्या इंस्टाग्रामवर चारूसोबतचा एक इंटिमेट फोटो शेअर केला होता. हा फोटो सोशल मीडियावर खूपच चर्चेत आला होता. या इंटिमेट फोटोंवरून चारू असोपा ट्रोल झाली होती. यानंतर राजीवने तो फोटो डिलीट केला. याच दरम्यान दोघांच्यात या फोटोवरून जोरदार भांडण झाले आणि हे कपल विभक्त राहू लागले.

यानंतर लॉकडाऊन दरम्यान पुन्हा दोघांमध्ये भांडण झाल्याची माहिती समोर आली. तर दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केल्याचे वृत्तही समोर आलं आहे. यामुळे दोघांच्या घटस्फोटोच्या चर्चांना सोशल मीडियावर उधान आलं आहे. परंतु, याच दरम्यान राजीव आणि चारूने याबबातची कोणतीही माहिती सोशल मीडियावर शेअर केलेली नाही.

एका वेबसाईटला दिेलेल्या मुलाखतीत राजीवने चारूला भोली असून तिचे ब्रेनवॉश करण्यात यावे असे म्हटले होते. यावर उत्तर देताना चारूने मी भोळी आहे, मग ब्रेनवॉश करण्यासाठी राजीवने मला एकटी का सोडले?. अशा वेळी तो सोबत असायला हवा होता असे म्हटले होतं. याशिवाय राजीव आणि चारू दोघांच्यासोबत त्याच्या मुलीचे देखील फोटोज सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajeev Sen (@rajeevsen9)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajeev Sen (@rajeevsen9)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajeev Sen (@rajeevsen9)

Back to top button