नगर : पोलिसाला मारहाण; रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा | पुढारी

नगर : पोलिसाला मारहाण; रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा

नगर : पुढारी वृत्तसेवा : मनमाड रोडवरील पत्रकार चौकात ड्युटी करणार्‍या वाहतूक शाखेतील पोलिस नाईक भाऊसाहेब विठ्ठल वाघ यांना सिग्नल तोडणार्‍या रिक्षा चालक निलेश सिद्दप्पा दहिहंडे (रा.गवळीवाडा) याने शिवीगाळ करून गचांडी धरून रस्त्यावर मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

पक्षांतर करणाऱ्या आमदारांवर ५ वर्षांची बंदी घाला; सुप्रीम कोर्टात याचिका, महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवरही प्रश्न उपस्थित

रिक्षा चालक निलेश सिद्दप्पा दहिहंडे हा सावेडी कडून शहरात जात असताना त्याने सिग्नल तोडून पळ काढत असताना त्याला पोलिसांनी पकडले. यावेळी रिक्षा चालकाने ‘रिक्षा का अडविली, तुला बघून घेतो’, पोलिस माझे काही करू शकत नाही. असे म्हणून शिविगाळ व गचांडी पकडली, असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हि घटना सकाळी 10 च्या सुमारास घडली.
यावेळी इतर कर्मचार्‍यांनी त्याला समजावून सांगितले मात्र त्याने शिवीगाळ सुरूच ठेवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावेळी त्याला रिक्षासह तोफखाना पोलिस ठाण्यात हजर करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तोफखाना पोलिस करत आहेत.

Back to top button