

पुढारी ऑनलाईन डेस्क : तुम्हा सर्वांना 'राम तेरी गंगा मैली'ची मंदाकिनी (mandakini comeback) आठवत असेल. इतक्या वर्षांनंतर तिने पुन्हा बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्याची तयारी केली आहे. विशेष म्हणजे, यावेळी ती आपल्या मुलासोबत कमबॅक करत आहे. मंदाकिनी लवकरच तिचा मुलगा रब्बिल ठाकूरसोबत 'माँ ओ माँ' या गाण्यात दिसणार आहे. (mandakini comeback)
मंदाकिनी गेल्या २६ वर्षांपासून इंडस्ट्रीपासून दूर आहे. पण आता ती दिग्दर्शक साजन अग्रवाल यांच्या म्युझिक व्हिडिओद्वारे पुनरागमन करत आहे. मंदाकिनीसोबत तिचा मुलगा रब्बील पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. रब्बिल हा मंदाकिनीचा पहिला मुलगा आहे.
१९९० मध्ये त्यांनी माजी बौद्ध माँक डॉ. Kagyur T. Rinpoche Thakur यांच्याशी लग्न केले. त्यानंतर त्यांना रब्बिल आणि मुलगी रब्जा इनाया ही मुले झाली. मंदाकिनी यांचे पती डॉ. ठाकूर हे देखील १९७० आणि ८० च्या दशकात मर्फी रेडिओ जाहिरातींमध्ये बालकलाकार होते.
लग्नानंतर मंदाकिनीने बौद्ध धर्म स्वीकारला होता. त्यामुळे रब्बिलही याच धर्माला मानतात. ती अशा स्टार किड्सपैकी एक आहे जी लाईमलाईटपासून दूर आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे चांगले फॉलोअर्स आहे. तो त्याच्या आईच्या खूप जवळ आहे आणि तिच्यासोबत अनेक फोटो शेअर करत असतो.
त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पाहून समजते की तो विवाहित आहे. २०२१ मध्ये त्याने एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये तो एका सुंदर मुलीचा हात धरलेला दिसत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, रब्बिल आणि बुशरा कायमचे एकत्र, मी माझ्या सर्वात चांगल्या मित्राशी लग्न केले.
आता रबिल ठाकूर आपल्या आईसोबत इंडस्ट्रीत एन्ट्री घेणार आहे, ज्यासाठी तो खूप उत्सुक आहे. त्याची आई मंदाकिनीही तिच्या मुलासोबत पदार्पण करण्यासाठी खूप उत्साहित आहे. आपल्या मुलाने इंडस्ट्रीत अधिक काम करावे अशी तिची इच्छा आहे.