

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडची देसी गर्लच्या (nick jonas daughter) बाळाची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतूर झाले आहे. ती आणि निक जोनास आपल्या बाळासोबत क्वालिटी टाईम स्पेंड करत आहेत. निक जोनासचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोमध्ये निक आपल्या परीची बोटे धरून तिला चालवताना दिसत आहे. याफोटमध्ये आणखी एक खास गोष्ट आहे. (nick jonas daughter)
प्रियांका चोप्रा आई झाल्यानंतर तिने आपल्या बाळाला सर्वांपासून दूर ठेवले आहेत. तिच्या बाळाचा चेहरा कुणालाच दिसलेला नाही. प्रियांका आणि निक त्यांच्या बिझी शेड्यूलमधूनही आपल्या कुटुंबाकडे लक्ष देत आहेत.
निक जोनासने हा फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. त्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय-' First Father's Day with my little girl. Thank you @priyankachopra for the incredible Father Daughter sneakers and for making me a daddy I love you so much. Happy Father's Day to all the dads and caretakers out there. ❤️ ? @divya_jyoti'
निक जोनासने हा फोटो फादर्स डे च्या औचित्याने शेअर केला होता. हा फोटो शेअर केल्यानंतर निकला हॅप्पी फादर्स डे च्या ढिगभर शुभेच्छा यायला सुरुवात झाली.
खास बाब म्हणजे निकने शेएर केलेल्या फोटोमध्ये चिमुकलीचे आणि निकचे पाय दिसत आहेत. पायात पांढऱ्या रंगाचे बूट दिसत असून निकच्या एका पायातील बुटावर MM'S आणि दुसऱ्या पायतील बुटावर DAD असे लिहिलेले दिसते. बुटावर M हे अक्षर लिहिले आहे. त्याचबरोबर बाळाच्या बुटावर M असे अक्षर लिहिले आहे.
प्रियांका चोप्रा लवकरच हॉलिवूड चित्रपट इट्स ऑल कमिंग बॅक टू मी मध्ये दिसणार आहे. तसेच, ती लवकरच बॉलिवूड वेब सीरिज सिटाडेलमध्ये दिसणार आहे, ज्याचे शूटिंग तिने नुकतेच पूर्ण केले आहे. याशिवाय बॉलिवूड चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर ती फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' या चित्रपटात आलिया भट्ट आणि कॅटरिना कैफसोबत दिसणार आहे.