विट्यात सेतू कार्यालयात मनमानी; कारवाईची मागणी | पुढारी

विट्यात सेतू कार्यालयात मनमानी; कारवाईची मागणी

विटा ; पुढारी वृत्तसेवा : विट्यात मनमानी करणार्‍या सेतू कार्यालयावर प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी खानापूर तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे विटा तहसीलदार यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे की, शहरातील सेतू कार्यालयात मोठी मनमानी होत आहे. विशेषतः विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या दाखल्यांना जास्तीची फी आकारून लूट केली जात आहे. मात्र, त्यावर प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही. ही बाब अत्यंत चुकीची आहे. तरी या सेतू कार्यालयातील कारभाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी; अन्यथा आंदोलन करु.

यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नईम मुलाणी, सचिव किरण सुर्वे, सूरज जंगम, सनराज निकम, शहर अध्यक्ष सत्यजित पाटील, ओंकार शिंदे, प्रवीण गायकवाड, तुषार माळी आदी उपस्थित होते.

Back to top button