क्रीडा प्रशिक्षक बनायचंय? | पुढारी

क्रीडा प्रशिक्षक बनायचंय?

कोणताही खेळाडू घडवण्यात क्रीडा प्रशिक्षकाचा मोलाचा वाटा असतो. जर आपल्याला क्रीडा क्षेत्राची आवड असेल परंतु खेळाडू म्हणून आपण यशस्वी ठरला नसाल तर क्रीडा प्रशिक्षक राहून आपण क्रीडा क्षेत्राची सेवा करू शकता. क्रीडा क्षेत्राशी निगडित राहायचे असेल तर केवळ खेळाडू होणे गरजेचे नाही तर प्रशिक्षक होऊनही सक्रिय राहू शकतो. क्रीडा प्रशिक्षकाच्या माध्यमातून स्वत:चे अस्तित्व तयार करता येते.

चित्रपटाप्रमाणेच क्रीडा क्षेत्राचेही युवकांना नेहमीच आकर्षण राहिले आहे. आपल्याकडे लहानपणापासूनच मुलांच्या मैदानी खेळाला प्रोत्साहन दिले जाते आणि कालांतराने ज्या मुलाला खेळाची आवड तो त्या क्षेत्राकडे आकृष्ट होतो. अनेक जण यामध्ये करिअरही करतात. सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, सायना नेहवाल, पीव्ही सिंधु, विश्‍वनाथन आनंद यासारख्या प्रतिभावंत कलाकारांनी लहानपणापासूनच क्रीडा क्षेत्राला वाहून घेतले आणि कालांतराने ते या क्षेत्रातील आदर्श बनले. अर्थातच यासाठी त्यांना मेहनत, सचोटी, जिद्द याबरोबरच सुयोग्य मार्गदर्शकाची साथ लाभली. किंबहुना त्यामुळेच त्यांना दिशा मिळाली आणि पुढील टप्प्यावर यश मिळत गेले. सचिन तेंडुलकर आपल्या मुलाखतीमध्ये नेहमीच प्रशिक्षक रमाकांत आचरेकरांचा उल्लेख आदराने करायचा.

कोणताही खेळाडू घडवण्यात क्रीडा प्रशिक्षकाचा मोलाचा वाटा असतो. जर आपल्याला क्रीडा क्षेत्राची आवड असेल परंतु खेळाडू म्हणून आपण यशस्वी ठरला नसाल तर क्रीडा प्रशिक्षक राहून आपण क्रीडा क्षेत्राची सेवा करू शकता. क्रीडा क्षेत्राशी निगडित राहायचे असेल तर केवळ खेळाडू होणे गरजेचे नाही तर प्रशिक्षक होऊनही सक्रिय राहू शकतो. क्रीडा प्रशिक्षकाच्या माध्यमातून स्वत:चे अस्तित्व तयार करता येते.

प्रशिक्षकाची वाढती भूमिका

आजकाल प्रत्येक क्रीडा स्पर्धा, अ‍ॅथेलिट इव्हेंटसाठी प्रशिक्षकाची गरज भासते. एक प्रशिक्षकही संघासाठी पात्र खेळाडूंची निवड करत असतो. त्याला खेळाचे नियम, डावपेच आणि मार्गदर्शन करत असतो. अनेकदा तर सामन्याची रणनीती देखील प्रशिक्षकच आखतो. खेळाडूंवर आणि त्यांच्या हालचालीवर सतत नजर असते. त्यांच्यातील त्रुटी दूर करण्याचे काम प्रशिक्षक करत असतो. म्हणजेच तो शिक्षकाबरोबरच एक टीकाकाराचीही भूमिका बजावत असतो.

शैक्षणिक पात्रता

क्रीडा प्रशिक्षक या नात्याने करिअर सुरू करण्यासाठी आपल्याला योग्य शिक्षण आणि प्रशिक्षण घेण्याची गरज असते. भारतात अनेक संस्था आणि विद्यापीठ पदवी, डिप्लोमा अभ्यासक्रम शिकवण्याचे काम करत आहेत. यासाठी आपल्याला किमान पदवीधर असणे गरजेचे आहे. यात शास्त्र शाखेच्या पदवीधरला प्राधान्य दिले जाते. शिक्षणाच्या पात्रतेशिवाय कोणत्याही प्रमुख इंटरनॅशनल इव्हेंट किंवा स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर सीनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये देखील सहभाग घेतलेला असावा. अनेकदा इन्स्टिट्यूटने घेतलेल्या परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारावरच उमेदवारांची भरती केली जाते.

विकासाची संधी

क्रीडा प्रशिक्षक या नात्याने आपण सरकारी आणि खासगी क्षेत्रामध्ये देखील काम करू शकता. बीसीसीआय, आयसीसी, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन, कॉमनवेल्थ गेम्स आदी ठिकाणांशी जोडण्याची संधी मिळते. यातून स्वत:ची ओळखही निर्माण होते. अलीकडच्या काळात अनेक क्रीडा संस्था, संघ मैदानात उतरत आहेत. आपणही त्यांच्याशी जोडले जावू शकतो. याशिवाय शाळा, कॉलेज,
क्रीडा विद्यापीठमध्ये फिजिकल एज्युकेशन टीचर, इन्स्ट्रक्टर किंवा प्रशिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळते.

पात्रता

* कम्युनिकेशन स्किल चांगले असणे
क्रिकेट, हॉकी, फुटबॉल आदींपैकी कोणत्याही एखाद्या क्रीडा प्रकारात प्रावीण्य असणे गरजेचे
खेळाप्रती प्रामाणिक आणि प्रचंड उत्सुक असावे
संबंधित खेळाचे नियम, अटी आणि कायदा याची विस्तृत माहिती असावी
लिडरशीप किंवा कॅप्टनशिप क्‍वालिटी असणे गरजेचे आहे
शारीरिक रूपाने संपूर्णपणे तंदुरुस्त असणे गरजेचे आहे
क्रीडा प्रशिक्षणासाठी अत्याधुनिक तंत्राचा वापर करण्यावर भर देण्याची हातोटी असायला हवी

नितीन कुलकर्णी

Back to top button