पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथचा सुपरस्टार विजय थलापती 'बीस्ट' नंतर (Thalapathy 66) वामशी पैडिपल्लीसोबत त्याच्या पुढच्या चित्रपटावर काम करत आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही पण तात्पुरते 'थलापथी ६६' असे म्हटले जात आहे. दरम्यान, चित्रपटाच्या निर्मात्यांकडून एक मोठे अपडेट समोर आले आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी सांगितले की, 'थलापथी ६६' चा फर्स्ट लूक २१ जून रोजी संध्याकाळी ६ वाजून १० मिनिटांनी रिलीज होणार आहे. (Thalapathy 66)
चित्रपटाच्या निर्मात्यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिलीय. विजयच्या वाढदिवसापूर्वी ही माहिती चाहत्यांसाठी एखाद्या मोठ्या भेटवस्तूपेक्षा कमी नाही. विजयच्या फर्स्ट लूकसोबतच चित्रपटाचे मोशन पोस्टरही रिलीज होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
विजयने तमिळ चित्रपटमध्ये सोशल पोस्टरचा ट्रेंड सुरू केला होता. त्याचा 'कथी' हा तमिळ पहिला चित्रपट होता, त्यावेऴी त्याचे मोशन पोस्टर रिलीज झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, विजयने नुकताच चित्रपटाच्या फर्स्ट लूकसाठी फोटोशूट पूर्ण केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चाहत्यांना या चित्रपटात विजयची नवीन स्टाईल पाहायला मिळणार आहे.
रश्मिका मंदान्ना, प्रकाश राज, प्रभू, योगी बाबू, शाम, श्रीनाथ, खुशबू, संगीता आणि संयुक्ता षणमुगनाथन यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा एक फॅमिली ड्रामा चित्रपट असेल. या चित्रपटाचे संगीत थमन यांनी दिले आहे, तर छायाचित्रन कार्तिक पलानी यांनी केले आहे.
विजय शेवटचा बीस्ट चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाला लोकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची कामगिरी सरासरी होती. विजयचा हा चित्रपट हिंदी पट्ट्यातही लोकांच्या मनाला स्पर्श करू शकला नाही.
हेदेखील वाचा-