दीपिका म्हणते, ‘ते’ येतच राहोत | पुढारी

दीपिका म्हणते, ‘ते’ येतच राहोत

मुंबई ः दीपिका आणि रणवीर सिंग ही बॉलीवूडमधील एक हॉट जोडी समजली जाते. या दोहोंची ऑन-स्क्रीन आणि ऑफ-स्क्रीन केमिस्ट्री अत्यंत चांगली आहे. हे दाम्पत्य नेहमीच एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्‍त करण्यात मागे पडत नाही. नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात रणवीरने ‘पिंकविला स्टाईल आयकॉन अ‍ॅवॉर्ड’ जिंकला. त्यानंतर सोशल मीडियावर रणवीरचे अभिनंदन करणार्‍या प्रतिक्रियांचा पाऊस पडला; पण यामध्ये अत्यंत खास ठरली ती पत्नी दीपिकाची प्रतिक्रिया. कबीर खानच्या हस्ते ‘पिंकविला स्टाईल आयकॉन अ‍ॅवॉर्ड’ घेतानाचा फोटो रणबीरने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केला. प्रतिक्रिया व्यक्‍त करताना दीपिकाने लिहिले आहे की, आमची कपाटे सध्या कुकीजने भरली आहेत; पण कोण पर्वा करते, पुरस्कार येतच राहोत. दरम्यान, दीपिका लवकरच दक्षिणात्य सुपरस्टार प्रभाससोबत ‘प्रोजेक्ट के’मध्ये दिसणार आहे. याशिवाय ऋत्त्विक रोशनसोबत ‘फाईटर’ चित्रपटात काम करणार आहे.

Back to top button