Kiara Advani : मेट्रोमध्ये चाखली वडापावची चव, कियारा-वरुण धवन झाले ट्रोल | पुढारी

Kiara Advani : मेट्रोमध्ये चाखली वडापावची चव, कियारा-वरुण धवन झाले ट्रोल

पुढारी ऑनलाईन डेस्क: कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि वरुण धवन सध्या त्यांच्या आगामी ‘जुग जुग जिओ’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. यासाठी दोन्ही स्टार्सनी मुंबई मेट्रोमध्ये प्रवास केला. या प्रवासाचा व्हिडिओ समोर आला आहे. मेट्रोमध्ये प्रवास करताना दोन्ही सेलेब्सनी असे काही केले की, त्यांना सोशल मीडियावर ट्रोल व्हावे लागले. (Kiara Advani)

युजर्सनी ही प्रतिक्रिया दिली

कियारा आणि वरुण दोघेही मेट्रोमध्ये जेवण करताना दिसले. मेट्रोच्या आत जेवणाला परवानगी नाही. अशा परिस्थितीत कियारा आणि वरुणच्या या व्हिडिओवर युजर्स नाराजी व्यक्त करत आहेत. एका युजरने लिहिले – मेट्रोमध्ये जेवायला परवानगी नाही. दुसर्‍याने लिहिले- ‘मेट्रोमध्ये खाण्यास मनाई आहे…व्हीआयपी ट्रीटमेंट.’ एकाने लिहिले- ‘आम्ही मुंबई मेट्रोमध्ये जेवू शकतो का?’ ‘मेट्रोमध्ये जेवणावर बंदी, आता तुमचा मेट्रोमध्ये जेवतानाचा व्हिडिओ व्हायरल होणार आहे.’ ‘नियम मोडणाऱ्यांना दंड ठोठावला पाहिजे.’

काही युजर्सनी मुंबई मेट्रोला टॅग करून आपला संताप व्यक्त केला आहे. एकाने लिहिले- ‘मेट्रोमध्ये जेवण निषिद्ध आहे ना? मग मुंबई मेट्रोचा हा दुटप्पीपणा का? सेलिब्रिटींसाठी वेगळे नियम आणि सामान्यांसाठी वेगळे? लवकरात लवकर दंड’. अशा अनेक कमेंट्स या व्हिडिओवर पाहायला मिळत आहेत. आता यावर कियारा आणि वरुणची काय प्रतिक्रिया आहे आणि त्यांना काय शिक्षा होईल, हे येणारा काळच सांगेल.

चित्रपट यादिवशी प्रदर्शित होईल

चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर हे दोन्ही स्टार दिग्दर्शक राज मेहता यांच्या जुग जुग जिओ या चित्रपटात दिसणार आहेत. हा फॅमिली कॉमेडी ड्रामा २४ जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. कियारा आणि वरुणशिवाय या चित्रपटात मनीष पॉल, प्राजक्ता कोहली, अनिल कपूर, नीतू कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

(video-viralbhayani insta वरून साभार)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Back to top button