सुशांत सिंह राजपूत स्मृतीदिन : रिया चक्रवर्तीने शेअर केला सुशांतसाेबतचा रोमँटिक फोटो | पुढारी

सुशांत सिंह राजपूत स्मृतीदिन : रिया चक्रवर्तीने शेअर केला सुशांतसाेबतचा रोमँटिक फोटो

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : बाॅलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा आज दुसरा स्मृतीदिन आहे. सुशांतच्‍या मृत्‍यूनंतर त्‍याच्या चाहत्‍यांमध्ये खळबळ उडाली होती. आजही त्‍याच्‍या आठवणी चाहत्‍यांमध्ये ताज्‍या आहेत. इतकंच नाही तर सुशांत सिंहची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीनेही त्‍याच्या स्‍मृतीदिनी त्‍याचे स्‍मरण केले आहे.  रिया चक्रवर्तीने तिच्या इंस्‍टाग्रामवर सुशांतसोबतचे फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे. रियाच्या या पोस्‍टवर चाहत्‍यांकडून अनेक कमेंट येत आहेत.

सुशांत सिंग राजपूतसोबतचा तिचा फोटो शेअर करत रिया चक्रवर्तीने लिहिलं आहे की, ‘मला रोज तुझी आठवण येते.’ रियाच्या या पोस्टवर चाहत्यांनी लिहिले आहे की, आम्हीही त्‍याला खूप मिस करतो. त्याच्या आत्म्याला शांती लाभो आणि रिया तू ही मजबूत राहा. अशा प्रकारे सर्व चाहते सुशांत सिंग राजपूतला मिस करत आहेत.

29 वर्षीय रिया चक्रवर्तीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, ती दिग्दर्शक रुमी जाफरी यांच्या ‘चेहरे’ चित्रपटाचा भाग होती. या चित्रपटात रियासोबत अमिताभ बच्चन, इमरान हाश्मी आणि अनु कपूर दिसले होते. रियाने तिच्या करिअरची सुरुवात ‘मेरे डॅड की मारुती’ या चित्रपटातून केली होती. रिया चक्रवर्तीने हिंदीशिवाय तुनेगा, तुनेगा या तेलगू चित्रपटांमध्येही काम केले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button