Joker २ : 'जोकर २' येतोय; लेडी गागा हार्ले क्वीनच्या भूमिकेत? | पुढारी

Joker २ : 'जोकर २' येतोय; लेडी गागा हार्ले क्वीनच्या भूमिकेत?

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिग्दर्शक टॉड फिलिप्सने ‘जोकर २’ च्या सिक्वेलची गेल्या काही दिवसांपुर्वी घोषणा केली होती. यानंतर ऑस्कर विजेती आणि पॉप गायिका लेडी गागा आगामी ‘जोकर २’ चित्रपटात हार्ले क्वीनची भूमिका साकारण्यासाठी सज्ज असल्याची माहिती समोर येत आहे.

२०१९ मध्ये आलेल्या ‘जोकर’ या चित्रपटाचे चाहत्यांच्या मनावर राज्य गाजवले आहे. यातील जोकरच्या भूमिकेने चाहत्यांना खळखळून हसायला लावले. यामुळे लहानपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच ‘जोकर’ चित्रपट आजही आठवणीत राहिला आहे. याच दरम्यान पुन्हा चाहत्यांना ‘जोकर’ चित्रपटाचा सिक्वेल येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

दिग्दर्शक टॉड फिलिप्सने गेल्या काही दिवसांपुर्वी ‘जोकर २’ च्या सिक्वेलची घोषणा केली होती. यानंतर चित्रपटातील हार्ले क्वीनची भूमिका साकारण्यासाठी पॉप गायिका लेडी गागा हिच्याशी बोलणी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. तर हॉलिवूड अभिनेता जोक्विन फिनिक्सला मुख्य जोकरच्या भूमिकेसाठी साईन करण्यात आले आहे.

हॉलिवूड सुत्राच्या माहितीनुसार, ‘जोकर २’ हा चित्रपट म्यूजिकल चित्रपट असू शकतो. तर गायिका लेडी गागाला हार्ले क्वीनची भूमिकेसाठी साईन केले आहे. या चित्रपटातून लेडी गागा पहिल्यांदा मुख्य भूमिका साकारणार आहे. यामुळे चाहत्यांना चित्रपटाची अतुरता शिगेला पोहोचली आहे.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Todd Phillips (@toddphillips)

 

View this post on Instagram

 

A post shared by Lady Gaga (@ladygaga)

 

View this post on Instagram

 

A post shared by Lady Gaga (@ladygaga)

 

View this post on Instagram

 

A post shared by Lady Gaga (@ladygaga)

Back to top button