Anushka Sharma Photo : चक्क सूर्याला लाजवते तेव्हा...; अनुष्काचा हॉट लूक | पुढारी

Anushka Sharma Photo : चक्क सूर्याला लाजवते तेव्हा...; अनुष्काचा हॉट लूक

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या क्रिकेट संघाचा कर्णधार आणि पती विराट कोहलीसोबत मालदीवच्या समुद्र किनाऱ्या व्हेकेशन एन्जॉय करत आहे. अनुष्काने स्वतः चे सध्या लेटेस्ट एकापेक्षा एक हॉट फोटो ( Anushka Sharma Photo )  शेअर करून सोशल मीडियात धूमाकूळ घातला आहे.

अभिनेत्री अनुष्का शर्मा तिच्या फॅशन सेन्स आणि स्टाइलमुळे नेहमी चर्चेत असते. सध्या अनुष्का पती विराटसोबत मालदीवच्या समुद्र किनाऱ्यावर सुट्यांचा आनंद लूटत आहे. येथील तिने हॉट फोटोज तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करून चाहत्यानी धक्का दिला आहे. सध्या तिच्या आणखी एका ब्लॅक रंगाच्या मोनोकिनीतील लेटेस्ट फोटो चाहत्यांच्‍या पसंतीस उतरला आहे. अनुष्काने स्वत:च सेल्फी घेत हा फोटो ( Anushka Sharma Photo ) काढला आहे.

या फोटोतील खास म्हणजे, अनुष्काने तिच्या डोक्यावर सुंदर अशी हॅट परिधान करून लाजताना दिसली आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘When the sun made me shy.. 🌊👒☀️’. असे लिहिले आहे. यावरून अनुष्का सुर्याला पाहून लाजताना दिसतेय. यावेळी मोकळ्या केसाच्या हेअरस्टाईल, पीक रंगाची लिपस्टिक आमि मेकअपने तिच्या सौदर्यात भर घातली आहे. यात अनुष्का खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे. दुसऱ्या फोटोत अनुष्का समुद्राच्या लाटाच्या जवळ उभी असून, तिने पाण्याकडे पाहताना पोझ दिली आहे. या फोटोत समुद्राच्या पाण्यासोबत छोटे घर दिसतेय. हे फोटो चाहत्याच्या पसंतीस उतरले आहेत.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कौतुक केले आहे. या फोटोला नेटकऱ्यांनी ‘हॉटनेस ओव्हरलोड’, ‘जबरदस्त लुक’, ‘भव्य’, ‘सुंदर’, ‘अप्रतिम’, ‘हॉट’, ‘खूप गोंडस’ आणि ‘कोणीही तुम्हाला सुंदरतेमध्ये हरवू शकत नाही.’ अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. याशिवाय काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत. अनुष्काच्या या फोटोंवर काही तासांतच ८ लाखाहून अधिकांनी लाईक्स मिळाल्या आहेत. अनुष्का नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांना अपडेटस देत असते.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

Back to top button