Kushal Badrike : ‘अख्ख घर दाटून आल्यासारख…’ अभिनेता कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Kushal Badrike
Kushal Badrike

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर हास्याचा कल्लोळ पसरविणारे अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) चाहत्याच्या घराघरांत पोहोचला आहे. या शोमधील अभिनयामुळे विनोदाचा बादशाह अशी त्‍याची ओळख झाली आहे. कुशल नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतो. नुकतीच एक हटके पोस्टने केल्‍यामुळे ताे साेशल मीडियावर चर्चेत आला आहे.

मुंबईसह कोकणातील आसपासच्या परिसरात सर्वत्र सध्या पावसाचा हंगाम सुरू आहे. याच दरम्यान अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) ने त्याच्या इंन्स्टाग्रामवर आपल्या लाडक्या दोन मुलांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत कुशल यांची दोन मुले त्याच्या टेरेसच्या गॅलरीतून पावसाचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहेत. यातील एक मुलगा आभाळाकडे बोट करून दाखवत आहे. तर दुसरा शांतपणे एकटक पावसाकडे पाहताना दिसतोय.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये कुशलने 'माझी दोन्ही आभाळं गॅलरीमधून पाऊस पहातायत, आणि अख्ख घर दाटून आल्यासारख झालंय .??'.असे लिहिले आहे. या फोटोतील खास म्हणजे, पाऊस, आकाश आणि डोगरांचे सुंदर चित्रण केले गेलं आहे. यावरून लहान मुलांना पावसात भिजण्याचा वेगळाच आनंद होत असल्याचे दिसतेय. तर कुशल बद्रिके यालाही पावसात भिजण्याचा मोह झाल्याचे जाणवते.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी या फोटोचे भरभरून कौतुक केले आहे. यात एका युजर्सने 'वा . सुंदर ❤️', 'दूर जाऊन आभाळ ही थकत,, शेवटी येवून क्षितिजाला टेकत ❤️❤️❤️',,,'मस्त शब्द रचना आणि फोटोही छान आहेत ??❤️', 'Wa मस्तच?' आणि 'अप्रतिम ?'. असे म्हटले आहे. तर काही युजर्सनी 'पाणी आत येतं का?', 'वीज कोठे दिसत नाहीये?' असे प्रश्न देखील विचारले आहेत.

'चला हवा येऊ द्या' या शोमध्ये कुशल बद्रिकेच्या अभिनयाने आजही चाहते खळखळून हासतात. कुशल याच्या इन्स्टाग्रामवर वेगवेगळे व्हिडीओ पाहायला मिळतात. मध्यंतरी 'पांडू' चित्रपटाच्या सेटवरचे काही व्हिडीओ शेअर केले होते. लवकरच तो  'जत्रा २' चित्रपटात दिसणार आहे.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news