आमीर खानची बहीण छोट्या पडद्यावर | पुढारी

आमीर खानची बहीण छोट्या पडद्यावर

पुढारी ऑनलाईन : बॉलीवूडचा ‘मि. परफेक्शनिस्ट’ आमीर खानचे कुटुंब जुन्या जमान्यापासूनच चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. स्वतः आमीर, त्याचा भाऊ, भाचा आदींनीही अभिनयाचे क्षेत्र निवडले होते. आता आमीर खानची थोरली बहीण निखत खान-हेगडे यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे.

त्यांनी सांगितले की आमीर खानची बहीण म्हणून नव्हे, तर ऑडिशन देऊन मी या मालिकेत पदार्पण केले आहे. ‘बन्‍नी चाऊ होम डिलिव्हरी’ असे या मालिकेचे नाव आहे. निखत यांनी या वयात अभिनयाचे धडे घेऊन नंतर या मालिकेसाठी ऑडिशन दिली होती.

हेही वाचलंत का? 

Back to top button