Tridha Choudhury : 'आश्रम'च्या बबीताने स्विमिंगपूलमध्ये लावली आग, बॉबी म्हणायला लागला 'जप नाम' 'जप नाम'! | पुढारी

Tridha Choudhury : 'आश्रम'च्या बबीताने स्विमिंगपूलमध्ये लावली आग, बॉबी म्हणायला लागला 'जप नाम' 'जप नाम'!

पुढारी ऑनलाईन डेस्क : आश्रम या वेब सीरिजची अभिनेत्री त्रिधा चौधरी (Tridha Choudhury) तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते. या वेब सीरिजमध्ये तिने बाबा निरालाच्या आश्रमातील सेविका बबिता ही व्यक्तिरेखा साकारली आहे. जी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. त्रिधा चौधरीच्या सोशल मीडियावरील पोस्टही अनेकदा व्हायरल होत असतात. आता तिचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. हे पाहून त्रिधा चौधरीच्या चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसू शकतो. व्हिडिओमध्ये ती धमाकेदार डान्स करताना दिसत आहे.

स्वतः त्रिधा चौधरीने (Tridha Choudhury) तिच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्रिधा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी अनेकदा खास फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. आता त्रिधाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये ती अभिनेता अभिमन्यू दासानीच्या निकम्मा चित्रपटातील टायटल साँगवर थिरकताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये त्रिधा चौधरी (Tridha Choudhury) निळ्या रंगाचा क्रॉप शर्ट आणि पांढर्‍या ट्राऊजरमध्ये दिसत आहे. ती ‘निकम्मा किया’ गाण्यावर जोरदार डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्रिधा चौधरीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘सर्व निरुपयोगींसाठी.’ अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्रिधा चौधरीच्या चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. तसेच कमेंट करून आपला अभिप्राय देत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tridha Choudhury (@tridhac)

त्रिधा चौधरीच्या डान्सचे अनेक चाहते कौतुक करत आहेत. त्याचबरोबर काहींनी तिच्या वेब सीरिजमधील बाबा निरालाचे डायलॉग जप नाम.. जप नाम.. हे कमेंट केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tridha Choudhury (@tridhac)

Back to top button