Rinku Rajguru photo : एक हुनर है चुप रहने का...रिंकू राजगुरुच्या नव्या लूकने लावले वेड

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरुच्या (Rinku Rajguru) दिग्दर्शक नागराज मंजूळे याच्या सैराट या धमाकेदार चित्रपटानंतर आणखी एक नवा चित्रपट येत आहे. रिंकूचा आगामी ‘आठवा रंग प्रेमाचा’ हा चित्रपट चाहत्याच्या भेटीस येत आहे. परंतु, सध्या रिंकू राजगुरुचा मराठमोळा लूक ( Rinku Rajguru photo ) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अभिनेत्री रिंकू राजगुरुने तिच्या इंन्स्टाग्रामवर नुकतेच भगव्या रंगाच्या साडीतील फोटो ( Rinku Rajguru photo ) शेअर केले आहेत. या साडीसोबत तिने ग्रीन रंगाचे सिव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे. यावेळी केसांचा अंबाडा, मेकअप आणि साजेशीर दागिन्याने तिच्या सौंदर्यात भर घातली आहे. यातील खास म्हणजे, रिंकूने दागिन्यामध्ये भरजरी नेकलेस परिधान करून चारचॉद लावले आहेत.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘एक हुनर है चुप रहने का… इक ऐब है कह देने का…’ असे लिहिले आहे. यातील फोटोना पोझ देताना तिने कधी आपले हाथ एकमेंकावर तर कधी आपल्या गाळावर ठेवल्याचे दिसते. या फोटोतून तिने शांत राहणे हे देखील संयमाचे असल्याचे दाखवून दिले आहे. याशिवाय तिचा आणखी एक व्हिडीओ शोशल मीडियावर शेअर झाला आहे.
या व्हिडीओमध्ये रिंकू एका ऑफिसमध्ये असून तिथे एक अचानक ऑफिस बॉय येतो. यानंतर रिकू त्याला लांबूनच हाताने खूणवत स्वत: येत असल्याचे सांगते. यानंतर ऑफिस बॉयच्या चेहऱ्यावर हसू फुलते. मात्र, क्षणार्धात ती ऑफिस बॉयचा हात बाजूला करत त्याच्या पाठीमागे असणाऱ्या हॅडसम व्यक्तीकडे जाते. हे पाहून ऑफिस बॉयच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. हा भन्नाट व्हिडिओ शेअर होताच कॉमेन्टचा पाऊस पडत आहे.
रिंकूचे हे फोटो सोशल मीडियावनर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कॉमेन्टस केल्या आहेत. यात एका युजर्सने ‘beautiful ❤️❤️❤️’, ‘Gorgeous 😍🥰’, ‘Kdk🔥’, ‘Beuty🌹’, ‘Waw so preety 🔥🔥🔥❤️’, ‘Beautiful very nice’, तर दुसऱ्या एका युजर्सने ‘किती सुंदर दिसतेस’, ‘अतिशय छान दिसतेस’. असे म्हटले आहे. याशिवाय काही चाहत्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत.
रिंकूचा आगामी ‘आठवा रंग प्रेमाचा’ चित्रपटाचे काही दिवसापूर्वी पोस्टर सोशल मीडियावर शेअर झाले होते. या चित्रपटामध्ये रिंकूने कृतिका नावाच्या मुलीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन खुशबू सिन्हा, निर्मिती राकेश राऊत आणि समीर कर्णिक, आशिष भालेराव यांनी केली आहे. हा चित्रपट १७ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचलंत का?
- Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री गडकरींचे बोलणे उज्जैनच्या खासदारांनी घेतले मनावर; १५ किलो वजन केले कमी
- अज्ञात वीरांची कहाणी सांगणारे वीरगळ; चाकणच्या तळेगाव चौकात आहेत ही स्मारके
- आजचे राशिभविष्य (दिनांक १२ जून)
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram