नयनतारा ६ वर्षाच्या डेटनंतर करणार ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकाबरोबर लग्न!

नयनतारा ६ वर्षाच्या डेटनंतर करणार ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकाबरोबर लग्न!

पुढारी ऑनलाईन डेस्क : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आपल्या अभिनयाने ओळख निर्माण केलेली अभिनेत्री म्हणजे नयनतारा. नयनतारा लवकरच एक सुप्रसिद्ध  दिग्दर्शकाबरोबर विवाहबंधनात अडकणार आहे. 

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक म्हणजे नयनतारा. ती दिग्दर्शक विघ्नेश शिवनसोबत (Vignesh Shivan) ९ जून (गुरूवार) रोजी विवाहबंधनात  अडकणार आहे. तब्बल ७ वर्षाच्या रिलेशननंतर ती विवाह बंधनात अडकणार आहे. नयनतारा आणि  विघ्नेश यांची ओळख विजय सेतुपतीच्या 'नानूम रावडीधान' या चित्रपटाच्या सेटवर झाली होती.  या दोघांच उद्या गुरुवारी सकाळी ८.३० वाजता लग्न विधीला सुरुवात होणार आहे. एका वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार या विवाहसोहळ्याचा व्हिडिओ  नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे.

नयनताराचे या अगोदर तामिळ चित्रपटसृष्टीतील काही सेलिब्रिटींसोबत नाव जोडले गेले होते. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा  नयनतारा आणि विघ्नेश यांचे चाहते दोघांचे अभिनंदन करत आहेत.

हेही वाचलंत का?

 

View this post on Instagram

 

A post shared by nayanthara? (@nayantharaaa)

logo
Pudhari News
pudhari.news