HSC Result 2022 : कोकण विभाग अव्वल! बारावी परीक्षेचा निकाल 94.22 टक्के, यंदाही मुलीच सरस | पुढारी

HSC Result 2022 : कोकण विभाग अव्वल! बारावी परीक्षेचा निकाल 94.22 टक्के, यंदाही मुलीच सरस

पुणे: राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे डोळे ज्या निकालाकडे लागले होते तो बारावीचा निकाल बुधवारी जाहीर झाला आहे. हा निकाल राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी 1 वाजल्यापासून पाहता येणार आहे. राज्याचा एकूण निकाल 94.22 टक्के लागला आहे. कोकण मंडळाचा निकाल सर्वाधिक 97.21 टक्के लागला आहे. तर मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी (90.04 टक्के) आहे. 2020 च्या तुलनेत निकाल 3.56 टक्क्यांनी वाढला आहे. 2021 ला परीक्षा घेण्यात आली नव्हती. यंदाही मुलीच सरस ठरल्या आहेत. 95.35 टक्के विद्यार्थिनी तर 93.29 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच 24 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.

विद्यार्थ्यांची आकडेवारी :

– परीक्षा दिलेले विद्यार्थी : 14 लाख 39 हजार 731
– उत्तीर्ण विद्यार्थी : 13 लाख 56 हजार 604
– निकालाची टक्केवारी : 94.22 टक्के

विभागानुसार निकाल

पुणे :  93.61 टक्के
नागपूर : 96.52 टक्के
औरंगाबाद : 94.97 टक्के
मुंबई : 90.91 टक्के
कोल्हापूर : 95.07 टक्के
अमरावती : 96.34 टक्के
नाशिक : 95.03 टक्के
लातूर : 95.25 टक्के
कोकण : 97.21 टक्के

शाखानिहाय निकाल

1. विज्ञान– 98.30 टक्के
2. कला – 90.51 टक्के
3. वाणिज्य– 91.71 टक्के
4. व्यवसायिक अभ्यासक्रम– 92.40 टक्के

कुठे पाहता येईल निकाल?

विद्यार्थ्यांना आणि पालकांना खालील संकेतस्थळांद्वारे निकाल पाहता येईल, त्याची प्रतही (पिंट्र आऊट ) घेता येईल. दुपारी १ वाजता या संकेतस्थळांवर निकाल उपलब्ध होणार आहे.

maharesult.nic.in
hscresult.mkcl.org
msbshse.co.in

मार्कशीट कधी मिळणार?

विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयामध्ये 17 जूनला गुणपत्रिका दिल्या जातील.

Back to top button