विधान परिषद निवडणूक : भाजपने पंकजा मुंडेंना डावलले; पण तिकीट मिळालेल्या उमा खापरे कोण आहेत? | पुढारी

विधान परिषद निवडणूक : भाजपने पंकजा मुंडेंना डावलले; पण तिकीट मिळालेल्या उमा खापरे कोण आहेत?

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा
भारतीय जनता पक्षाने विधान परिषद निवडणुकीसाठी ५ उमेदवारांची घोषणा केली आहे. यात विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री राम शिंदे, आमदार प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांचा समावेश आहे.

उमा खापरे या पिंपरी – चिंचवड येथील आहेत. गेली अनेक वर्षे ते भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या आहेत. सध्या त्या भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आहेत.उमा खापरे यांना राजकारणाचा आणि समाजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. १९९७पासून त्या राजकारणात आहेत. १० वर्षं त्यांनी नगरसेवक म्हणून काम केले आहे, तर विरोधी पक्षनेत्याची जबाबदारीही त्यांनी सांभाळली आहे.

भाजपच्या महिला मोर्चा या संघटनेत त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. ३ वेळा सरचिटणीस, प्रदेश प्रभारी, सोलापूर जिल्हा प्रभारी अशाही जबाबदाऱ्या त्यांनी सांभळल्या आहेत. त्यांना उमेदवारी मिळाल्याचे जाहीर झाल्यानंतर पिंपरीतील भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा : 

 

Back to top button