अभिनेता शाहरुख खानलाही कोरोनाची लागण | पुढारी

अभिनेता शाहरुख खानलाही कोरोनाची लागण

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अभिनेता शाहरुख खानला कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारीच अभिनेता कार्तिक आर्यन आणि आदित्‍य रॉय कपूर यांना कोरोनाची लागण झाल्‍याचे स्‍पष्‍ट झाले होते.

आज सकाळीच अभिनेत्री कॅटरीना कैफला कोरोनाची लागण झाल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. यानंतर काही तासांमध्‍येच शाहरुख खान याचेही कोरोना चाचणी पॉझिटिव्‍ह असल्‍याची माहिती समोर आली. नुकताच शाहरुख खानने त्‍याच्‍या आगामी जवान चित्रपटाचा टीजर रिलीज केला होता. सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चाही सुरु झाली आहे.

करण जोहरच्या पार्टीत कोरोनाचा विस्फोट, अनेक कलाकार बाधित?

करण जोहरच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीत कोरोनाचा विस्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या पार्टीला गेलेल्या बॉलिवूडमधील अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचा अंदाज आहे. नुकतेच अभिनेता कार्तिक आर्यन, आदित्य रॉय कपूर यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान आणखी काही कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता असल्याने सर्वाची तपासणी करण्यात येत आहे. (Corona in Bollywood)

बॉलिवूडचा निर्माता, दिग्दर्शक करण जोहरने ५०वा वाढदिवसानिमित्त एका खास पार्टीचे आयोजन केलं होतं. या पार्टीला बॉलिवूड ते हॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली. यात बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रॉय, कॅटरिना कैफ, सलमान खान, अभिषेक बच्चन, राणी मुखर्जी, प्रिती झिंटा, कार्तिक आर्यन, मलायका अरोरा आणि सीमा सजदेह हे कलाकार पार्टीत दिसले. या पार्टीनंतर कॅटरिना कैफ आणि कार्तिक आर्यन यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. यामुळे पार्टीतील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता असल्याने तपासणी करण्यात येणार आहे.

हेही वाचा : 

 

 

 

Back to top button