iifa award 2022 : ‘आयफा’मध्ये चंद्रा हे काय केलस तू 😮… | पुढारी

iifa award 2022 : 'आयफा'मध्ये चंद्रा हे काय केलस तू 😮...

पुढारी ऑनलाईन डेस्क: आयफा पुरस्कार सोहळा (iifa award 2022 ) नुकताच अबुधाबीमध्ये उत्साहात पार पडला. आयफाच्या ग्रीन कार्पेटवर बॉलिवूड सेलिब्रिटींच्या नवनवीन लुकने चाहत्‍यांचे लक्ष वेधून घेतले. यात खास करून  मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरचा जलवा पाहायला मिळाला.

आयफा पुरस्कार सोहळ्याच्या (iifa award 2022 )ग्रीन कार्पेटवर मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेत्री अमृता खानविलकर या दोघींचा जलवा पाहायला मिळाला. यावेळी सई ताम्हणकरने पांढऱ्या रंगाचा लॉग आऊटफिटसोबत ब्लॅक रंगाचा शार्टस परिधान केला होता. तर चंद्रा म्हणजे, अमृता ब्लॅक आणि ब्ल्यू रंगाच्या वेस्टर्न ड्रेसमध्ये दिसली.

यावेळी ब्लॅक रंगाच्या ड्रेससोबत मोकळ्या केसांनी, मेकअपने आणि प्लॅटिनमच्या दागिन्यानी तिच्या सौदर्य़ात भर घातली आहे.  विशेष म्हणजे, ब्लॅक रंगाच्या ड्रेसवर पांढऱ्या रंगाची केलेली डिझाईन आकर्षणाचा केंद्रबिदू ठरली. तर अमृताने आयफाच्या दुस-या दिवशी ब्ल्यू रंगाच्या ड्रेसमध्ये ग्रीन कार्पेटवर उतरली. अमृताचा हा लूक चाहत्याच्या पसंतीस उतरला आहे.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यासह बॉलिवूड स्टार्संनी भरभरून कॉमेन्टस केल्या आहेत. यात बॉलिवूड अभिनेत्री हिना खानने ‘Fire 🔥’, प्रार्थना बेहेरे हिने ‘Wowww😍😍❤️’, अभिज्ञा भावेने ‘Uffff😍’, सोनाली खेर ‘Lovelyyy’, राधा सागर ‘wow❤️❤️❤️❤️❤️’ तर प्रसाद ओक यांनी तीन ‘😍😍😍’ ईमोजी शेअर केले आहेत.

यासोबत काही नेटकऱ्यांनी ‘जीवघेणी’, ‘कडक मॅडम’, ‘हॉट’, ‘स्टनिंग’, ‘मराठी मुलगीही एवढी सुंदर कशी दिसू शकते’, ‘वाह…’, ‘Ufff beauty’ , ‘Hottie!!❤️’, ‘चंद्रा हे काय केलस तु 😮’, ‘Nice ❤️❤️’, ‘So beautifull ❤️❤️🔥’, ‘काय खर नाय…’, ‘Stunning 🔥🔥’, ‘Gorgeous 💜’, ‘Superb hottt Amu🔥🔥❤️❤️😍’, ‘खूप मस्त’, ‘एकदम भारी कडक जबरदस्त 😍😍🔥🔥🔥’, यासारख्या कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट, फायर आणि लव्हलीचे ईमोजी शेअर केले आहेत.

यंदाच्या आयफा सोहळ्यात बॉलिवूड अभिनेता सलमान खान, शाहिद कपूर, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या रॉय, विक्की कौशल , सारा अली खान, सई ताम्हणकर, संजय गगनानी, पूनम प्रीत, रतन लंबियां, नोरा फतेही, जॅकलिन फर्नांडिस, एरिका फर्नांडिस, राखी सावंत, अनन्या पांडे, अमिता अग्रवाल, नर्गिस फाखरी यांसारख्या अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती. तर सई ताम्हणकरने ‘मिमी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळविला.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajshri Marathi (@rajshrimarathi)

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

Back to top button