HBD : अशोक सराफ यांना मामा का म्हणतात, अशी आहे यामागची कहाणी | पुढारी

HBD : अशोक सराफ यांना मामा का म्हणतात, अशी आहे यामागची कहाणी

पुढारी ऑनलाईन डेस्क

दादा कोंडके यांच्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीचा तारणहार असणारा आणि अभिनयाच्या जोरावर अनेक भूमिका अजरामर करणाऱ्या अशोक सराफ यांचा आज वाढदिवस. त्यांच्या रुपाने मराठी चित्रपट सृष्टीला लाभलेलं एक प्रतिभेचं लेणच म्हणावं लागेल. आज अशोक सराफ ७५ वर्षांचे झाले आहेत.

अशोक सराफ तब्बल पाच दशकांपासून चाहत्यांचे मनोरंजन करत आहेत. आज या अद्भुत अभिनेत्याचा वाढदिवस आहे. त्यांनी अभ्यास संपवून नोकरी करावी अशी अशोकच्या वडिलांची इच्छा होती, पण अशोकचे स्वप्न काही वेगळे होते.

वडिलांच्या स्वप्नांसाठी अशोकने स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी केली. त्यांनी जवळपास जवळपास १० वर्षे बँकेत काम केलं. काम करत असतानाही अभिनयाचे स्वप्न त्याच्या डोळ्यांत जिवंत राहिले. त्यामुळेच ते नोकरीसह नाटकांमध्येही भाग घ्यायचे.

अशोक सराफ यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात मराठी लेखक विष्णू सखाराम खांडेकर यांच्या ‘ययाती’ या पुस्तकावर आधारित नाटकाने केली. त्यानंतर त्यांनी अनेक नाटकं केली आणि येथूनच त्यांना यश मिळू लागले. यानंतर त्यांचे काम चित्रपट निर्मात्यांपर्यंत पोहोचू लागले आणि ऑफर येऊ लागल्या.

अशोक सराफ यांना प्रथम मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. अगदी मराठी चित्रपटांतही या अभिनेत्याला बरीच मेहनत घेतल्यानंतर यश मिळालं. १९७५ मध्ये रिलीज झालेल्या पांडू हवालदार या चित्रपटाद्वारे त्यांना पहिले यश मिळाले. या चित्रपटामुळे त्याच्या कारकीर्दीचा चढता आलेख सुरु झाला. यानंतर हळूहळू ते मराठी चित्रपटाचे एक मोठे नाव बनले.

मामा नाव कसे पडले?

प्रत्येकजण मराठी सिनेसृष्टीत या अशोक सराफ यांना म्हणतात. वास्तविक, एका मराठी चित्रपटाच्या शूटिंगवर प्रकाश शिंदे नावाचा एक कॅमेरामन होता, जो अशोक सराफ यांना आपल्या मुलीला दाखवत असे आणि म्हणायचा की, तो बघ तुमचा अशोक मामा आहे. यानंतर हळूहळू चित्रपटातील प्रत्येकजण त्यांना मामा म्हणू लागले आणि त्यानंतर ते संपूर्ण चित्रपटसृष्टीचे मामा झाले.

छोट्या पडद्यावरही जादू केली

अशोक सराफ यांच्या अभिनयाने छोट्या पडद्यावरही चाहत्यांना वेड लावलं होतं. ‘हम पांच’ या ९० च्या दशकातील प्रसिद्ध शो कोण विसरू शकेल? या शोमध्ये अशोक सराफ दिसले होते आणि त्यांची कॉमेडी खूप आवडली होती. यानंतर ते सहारा टीव्हीच्या डोंट वरी हो जयगा मध्येदेखील दिसले.

Back to top button