मुंबई कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या उंबरठ्यावर! | पुढारी

मुंबई कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या उंबरठ्यावर!

मुंबई : मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे पालिका प्रशासन सतर्क झाले आहे. शुक्रवारी पालिका आयुक्तांनी वरिष्ठ अधिकार्‍यांसह हॉस्पिटल अधिष्ठाता, टास्क फोर्स प्रमुखांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली.यावेळी कानपूर आयआयटीचा हवाला देत कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली.

या लाटेला थोपवण्यासाठी जम्बो कोव्हिड सेंटर, हॉस्पिटल व सर्व वॉर्ड वॉर रूम सुसज्ज ठेवण्याचे निर्देश यावेळी आयुक्तांनी दिले. कानपूरच्या आयआयटी तज्ज्ञांनी जुलै 2022 मध्ये कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यांचा इशारा गांभीर्याने घेणे गरजेचे असल्याचे आयुक्तांनी सांगितले. कोव्हिड विषाणूच्या बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे, हे लक्षात घेतले तर चौथ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोव्हिड उपाययोजनांकडे पुन्हा एकदा लक्ष देणे आवश्यक असल्याचेही चहल यांनी सांगितले. त्यावर हा निकाल न्यायालयाने दिला आहे.

Back to top button