गॅसच्या टाकीचा स्फोट आणि , होत्याचं नव्हतं झालं !

बोटा : भूतांबरे कुटुंबातील दोन भावांचे राहते छप्पर जाळून खाक झाले. (छाया : सतिश फापाळे)
बोटा : भूतांबरे कुटुंबातील दोन भावांचे राहते छप्पर जाळून खाक झाले. (छाया : सतिश फापाळे)
Published on
Updated on

बोटा : पुढारी वृत्तसेवा

सख्ख्या भावांच्या राहत्या छप्परांना दुपारी उन्हात 3 वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने मोठे नुकसान झाले. ही दोन्ही छप्परे आगीत जाळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी दुपारी उन्हात घडली. संगमनेर तालुक्यातील पठार भागातील आंबीदुमाला गावात चंद्रकांत धावजी भुतांबरे व भागा धावजी भुतांबरे अशी या जळीतग्रस्त भावांची नावे आहेत.

आंबी दुमाला गावात ढेरंग पाईन या शेतमळ्यात आदिवासी समाजातील चंद्रकांत व भागा हे दोन्ही सख्खे भाऊ वास्तव्यास होते. मुळचे ते साकुर येथील रहिवासी आहेत. उदरनिर्वाहासाठी या गावातील शेतकरी विकास नरवडे यांच्याकडे वाट्याने शेती करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते, परंतु त्यांच्या सुखी संसाराला काळाची नजर लागली. दोघांच्या छप्परांना अचानक आग लागली.

आर्थिक मदत करावी..!
आदिवासी कुटुंबातील दोन्ही भाऊ उदरनिर्वाहासाठी गावात स्थायिक झाले होते. त्यांच्या राहत्या घरांना अचानक आग लागली. यात संसारोपयोगी साहित्यासह मोठे आर्थिक नुकसान झाले.त्यांना संसार पुन्हा उभा करण्यासाठी नागरिकांनी मदत करावी.

                                                        सरपंच, जालिंदर गागरे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news