म्हणे मुंबई असुरक्षित; सुशांत प्रकरणात अमृता फडणवीसांची उडी  | पुढारी

म्हणे मुंबई असुरक्षित; सुशांत प्रकरणात अमृता फडणवीसांची उडी 

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

मुंबईने माणुसकी हरवली आहे, मुंबई असुरक्षित आहे, असे ट्विट करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सुशांत आत्महत्या प्रकरणात उडी घेतली आहे. अमृता फडणवीस यांनी ट्विट करत निर्दोष, स्वाभिमानी नागरिकांसाठी मुंबई असुरक्षित असल्याचे म्हटले आहे. 

दरम्यान, सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आयपीएस अधिकारी मुंबईत पोहोचले आहेत. त्यांना क्वारंटाईन करण्यात आले. ठाकरे सरकारला कसली भीती वाटतेय? असा सवाल ट्विटच्या माध्यमातून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे. 

सुशांत प्रकरणातील सत्य समोर येईल म्हणून एसपींना क्वारंटाईन करण्यात आले. या प्रकरणातील अनेक गोष्टी दडवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. कुणाला तरी वाचवण्याची राज्य सरकारची भूमिका आहे, असा हल्लाबोल राम कदम कदम यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला. 

रिपोर्टनुसार, पाटणाचे एसपी विनय तिवारी यांना आयपीएस क्वार्टर्समध्ये खोली का मिळाली नाही, असा सवाल बिहार पोलिसांनी मुंबई पोलिसांना केला आहे.

काँग्रेस नेते संजय निरूपम यांनीही ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर लिहिले आहे की, ‘बीएमसी आणि मुंबई पोलिस वेडे झाले आहेत.’ 

सुशांत प्रकरणाच्या तपासासाठी एसपी बिहारहून मुंबईत दाखल 

सुशांत प्रकरणाच्या तपासासाठी पाटणाचे एसपी बिहारहून मुंबईत दाखल झाले आहेत. ते मुंबईत आल्यानंतर बीएमसीने त्यांना क्वारंटाईन केले आहे. त्यामुळे विरोधकांकडून ठाकरे सरकारवर टिका होत आहे. शिवाय, बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी महाराष्ट्र सरकारवर टिका केली आहे. विनय तिवारींबाबत जे काही झालं, ते योग्य झालं नाही, असे नितीशकुमार म्हणाले. 

 

Back to top button