‘दिशा सालियनची बलात्कारानंतर हत्या, सुशांतचाही मर्डर’ | पुढारी

‘दिशा सालियनची बलात्कारानंतर हत्या, सुशांतचाही मर्डर’

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह  राजपूत आत्महत्याप्रकरणावरून राज्यातील तसेच देशातील राजकारण ढवळून निघत आहे. तसेच या प्रकरणाच्या चौकशीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याच प्रकरणावरून भाजपचे नेते व राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी आज (दि. ४) महाविकास आघाडी सरकारवर वर हल्लाबोल केला असून सुशांतचा खून झाला असून त्याची मॅनेजर दिशा सालियन हिची बलात्कारानंतर हत्या झाल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

खा. राणे यांनी सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या आत्महत्याची पोलिसांनी चौकशी का केली नाही असा सवाल उपस्थित करून दिशाने आत्महत्या केली नाही, तर तिची देखील हत्या केल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, दिशावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. तिच्या गुप्तांगावर जखमा आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्या दृष्टीने तपास करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगीतले. तसेच सुशांतच्या प्रकरणात मुंबई पोलिस कुणाला वाचवतंय, असाही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Back to top button