‘ईफ्फी’ची तारीख ठरली, ‘या’ महिन्यात आयोजन | पुढारी

‘ईफ्फी’ची तारीख ठरली, ‘या’ महिन्यात आयोजन

पणजी : पुढारी ऑनलाईन 

भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात ईफ्फी येत्या नोव्हेंबरमध्ये वेळापत्रकाप्रमाणे होणार आहे. याबाबतची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे. हा चित्रपट महोत्सव येत्या २० ते २८ नोव्हेंबर मध्ये गोव्यात होणार आहे.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा महोत्सव भरवण्यात येऊ नये अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. गोव्यातले विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी आपल्या ट्विटर संदेशात ही मागणी केली आहे. 

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फी २०२० चे आयोजन करण्याचा सरकारने घेतलेल्या निर्णयाचा पुर्नविचार करावा. तसेच इफ्फीमुळे स्थानिक चित्रपट उद्योग तसेच पर्यटनाला कुठला लाभ झाला? यावर त्वरीत श्वेतपत्रिका जारी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी गुरूवारी जारी केलेल्या प्रसिध्दी पत्रकाव्दारे केली आहे. 

कोरोनामुळे गोवा राज्याच्या आर्थिक स्थितीला फटका बसला आहे. महसूलात घट झाली आहे. त्यामुळे सध्याची स्थिती पाहता इफ्फी सारख्या महोत्सवांचे आयोजन करणे योग्य ठरणार नाही. सरकारचा इफ्फीच्या ५१ वा महोत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय चुकीचा आहे. त्यामुळे या निर्णयावर सरकारने पुर्नविचार करावा अशी मागणीही त्यांनी केली.

 

Back to top button