RIP KK : गायक के के यांना कोलकातामध्ये दिली गेली बंदुकीची सलामी (Video) | पुढारी

RIP KK : गायक के के यांना कोलकातामध्ये दिली गेली बंदुकीची सलामी (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क

प्रसिध्द गायक कृष्णकुमार कुन्नथ अर्थातच के के ( RIP KK) यांचे मंगळवारी रात्री कोलकाता येथे निधन झाले. वयाच्या ५३ व्या वर्षी के के यांनी जगाचा निरोप घेतला. के के यांचे कुटूंब दिल्लीहून कोलकाता येथे गेले आहे. दरम्यान, के के यांच्‍या पार्थिवाला पश्चिम बंगाल सरकारतर्फे बंदुकीची सलामी दिली गेली . (RIP KK)

आज कोलकाता येथील रवींद्र सदन येथे के के यांच्‍या पार्थिवाला पश्चिम बंगाल सरकारच्‍या वतीने बंदुकीची सलामी दिली. या वेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित होत्या. के के यांच्या पार्थिवावर उद्या मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी के के म्हणून प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुननाथ यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. ममता बॅनर्जी यांनी ट्विटमध्ये लिहिले होते की, ‘बॉलिवूड पार्श्वगायक के के यांच्या आकस्मिक आणि अकाली निधनाने आम्हाला धक्का बसला आहे आणि दुःखही झाले आहे. माझे सहकारी काल रात्रीपासून आवश्यक औपचारिकता, आणि त्याच्या कुटुंबाला सर्व आवश्यक मदत पुरवली जावी यासाठी व्यस्त आहेत. माझ्या मनापासून संवेदना. तसेच, सीएम बॅनर्जी म्हणाले की, ‘पश्चिम बंगाल सरकार कोलकाता विमानतळावर गायक केके यांना बंदुकीची सलामी दिली जाईल. ‘.

भाजपचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनीही के के यांच्‍या  निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.  नड्डा यांनी ट्विट केले की, “लोकप्रिय गायक कृष्णकुमार कुनाथ यांच्या निधनाबद्दल ऐकून दुःख झाले. त्यांच्या अष्टपैलू संगीतासाठी ते कायम स्मरणात राहतील. मी त्यांच्या दिवंगत आत्म्यासाठी प्रार्थना करतो आणि त्यांच्या कुटुंबीयांना शोक देतो. ओम शांती.”

हेही वाचा : 

Back to top button