

पुढारी ऑनलाईन डेस्क : जवळजवळ निम्मा महाराष्ट्र जूनमध्येच जन्माला आला आहे…आणि तोही गुरुजींच्या पुण्याईमुळे…!, असे प्रख्यात लेखक पु. ल. देशपांडे म्हणायचे. त्या काळातील हा विनाेद हाेता. मात्र आज सोशल मीडिया पाहिला की, हा विनाेद वास्तववादी हाेता, याची प्रचिती आजच्या पिढीला येईल. आज व्हाॅटस ॲप, इन्स्टाग्राम, फेसबूक या सोशल साईटस पाहिल्या की तुम्हाला कोणाच्या बाबांचा, आईचा, काकांचा यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांचा आज वाढदिवस आहे हे त्यांच्या स्टेटसवरुन लक्षात येईल; पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का १ जूनलाच (birthday on 1st june) अनेकांचा वाढदिवस का असतो. याला 'जागतिक वाढदिवस' किंवा 'सरकारी वाढदिवस' का म्हणतात? जाणून घेवूया या विषयी…
आज बाळ जन्माला आलं की पहिल्यांदा बाळाची जन्मनोंदणी होते; पण साधारण ४० – ५० वर्षापूर्वीचा काळ हाेता. राेजच्या जगण्यात वार हाेते;पण तारखांचे महत्त्व नव्हते. त्यामुळे मुल जन्माला आलं की वार माहित असे पण तारखेची नाेंद हाेत असेल असे नाही. बाळाची जन्मतारीख लिहून ठेवायला हवी, असा नियमही नव्हता. जरी लिहून ठेवली तरी कागद कुठेतरी हरवून जायचा. ग्रामीण भागात मुलांना शाळेत घालायचा प्रसंग आला की, गुरुजींनी विचारलं "मुलाची, मुलीची जन्मतारीख सांगा" तेव्हा मात्र घरातल्या लोकांना प्रश्न उभा राहायचा; मग काय गुरुजी सांगतील ती जन्मतारिख व्हायची. शाळा या १ जूनला सुरु व्हायच्या. ज्यांना जन्मतारीख माहीत नसायचा तेव्हा गुरुजी सांगतील ती तारीख जन्मतारीख बनायची, अशा पद्धतीने १ जून हा सरकारी वाढदिवस हा ज्या मुलांच्या पालकांना त्यांची जन्मतारीख माहित नव्हती त्यांचा झाला. (birthday on 1st june)
१ जून ही जन्मतारीख शाळा, महाविद्यालयीन, नोकरी, सरकारी कागदपत्रांवर नाेंदली गेली. म्हणून या तारखेला गंमतीने 'सरकारी वाढदिवस' आणि जागतिक वाढदिवस म्हणतात. म्हणूनच पु.ल.नेहमी म्हणायचे, जवळजवळ निम्मा महाराष्ट्र जूनमध्येच जन्माला आला आहे…आणि तोही गुरुजींच्या पुण्याईमुळे…! हे वाक्य आजही पटतं. वाढदिवसाची तारीख सरकारी असली तरी ताे आनंदात साजरा हाेणे गरजेचे कारण तारखेपेक्षाही आनंद साजरा करण्याची भावना महत्त्वाची ठरते. शाळेचा पहिला दिवस हाच वाढदिवस झालेल्या सर्वांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ???
हेही वाचलंत का?