KK death : केकेने मृत्यूपूर्वी गायले होते ‘हे’ गाणे अन् क्षणातचं…(Video) | पुढारी

KK death : केकेने मृत्यूपूर्वी गायले होते 'हे' गाणे अन् क्षणातचं...(Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क

हार्टॲटॅक येण्यापूर्वी गायक केके (KK death) कोलकातामध्ये कन्सर्टमध्ये सहभागी झाला होता. त्यांनी ‘हम रहे या ना रहें कल, कल याद आएंगे ये पल…’ यासारखे गाणं गायलं, जे अखेरचं ठरलं. केके म्हणून प्रसिद्ध असलेले गायक कृष्णकुमार कुननाथ यांचे मंगळवारी कोलकाता येथे निधन झाले. (KK death) नझरूल मंच येथे एका महाविद्यालयाने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते, जेव्हा केके सुमारे एक तास गाऊन त्यांच्या हॉटेलवर परतले तेव्हा त्यांना अस्वस्थ वाटत होते.

गायक केकेच्या अंतिम परफॉर्मन्सचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. कॉन्सर्ट दरम्यान केके यांनी हम रहे या ना रहें कल, कल याद आएंगे ये पल…”, ‘आशाएं खिले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल, तू जो मिला तो हो गया सब हासिल, नहीं कुछ भी, नहीं कुछ भी…’ यासारखी गाणी गायली.

कॉन्सर्टचा व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर केके यांच्या निधनानंतर त्यांचे चाहते शोक व्यक्त करताना दिसत आहेत. ज्यामध्ये त्याच्या शेवटच्या कॉन्सर्टचा व्हिडिओ सर्वाधिक पाहिला जात आहे. केके यांच्या निधनाने बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. केके यांच्या निधनाबद्दल चित्रपट अभिनेता अक्षय कुमारपासून अनेक टेलिव्हिजन स्टार्सपर्यंत सेलिब्रिटीजनी शोक व्यक्त केला.

५३ वर्षीय केकेने हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि बंगालीसह अनेक भाषांमध्ये गाणी रेकॉर्ड केली आहेत. काईट्स चित्रपटातील ‘जिंदगी दो पल की’, ‘ओम शांती ओम’ चित्रपटातील ‘आँखों में तेरी’, ‘बचना ए हसीनो’ चित्रपटातील ‘खुदा जाने’, ‘तडप तडप’ या चित्रपटातील गाण्यांनी त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली.

हेदेखील वाचा-

Back to top button