K K : 'मी त्याला गमावलंय...'जीत गांगुलींना के के यांनी सांगितली होती 'ही' गोष्ट | पुढारी

K K : 'मी त्याला गमावलंय...'जीत गांगुलींना के के यांनी सांगितली होती 'ही' गोष्ट

पुढारी ऑनलाईन डेस्क

प्रसिद्ध संगीतकार आणि गायक जीत गांगुली यांनी के के (K K) यांच्या निधनानंतर दुःख व्यक्त केले आहे. मी त्याला गमावलंय अशा शब्दांत त्यांनी शोक व्यक्त केला आहे. जीत गांगुली यांनी बोलताना सांगितले की, माझा विश्वास बसत नाही. मी कोलकात्यात होतो. दोनच दिवसांपूर्वी माझे केकेशी बोलणे झाले होते. तो येथे परफॉर्म करणार असल्याचे त्याने सांगितले होते. मी कोलकात्याला येत आहे. कॉलेजच्या शोमध्ये परफॉर्म करणार असल्याचे त्याने फोन कॉलवर सांगितले होते. त्याने मला आमंत्रण दिलं होतं. मी जरा बिझी होतो म्हणून कॉन्सर्टला जाऊ शकलो नाही. त्याचा परफॉर्म पाहू शकलो नाही. (K K)

जीत गांगुली पुढे म्हणाले- आम्ही एकत्र मुंबईला परतणार होतो. ही बातमी ऐकल्यावर माझा विश्वासच बसेना. आता मी हॉस्पिटलमध्ये उभा आहे, आणि KK … यावर विश्वास बसत नाही. आता या अपघातानंतर मी कदाचित आयुष्याला कधीच गांभीर्याने घेऊ शकणार नाही. हे काय वय होतं, तो फक्त ५३ वर्षांचा होता. मी त्याला गमावलंय.

चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या केके यांना हृदयविकाराचा झटका आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, ते कोलकाता येथे एका कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करत होते. त्यानंतर त्यांची प्रकृती स्ट्रोकमुळे बिघडली आणि त्यानंतर त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला.

केकेने आपल्या कारकिर्दीत अनेक हिट गाण्यांमध्ये आपल्या आवाजाची जादू पसरवली आहे. यारोंपासून ते तडप तडप पर्यंत केकेची सर्व गाणी हृदयाला भिडतात. या अप्रतिम गायकाच्या निधनामुळे त्यांच्या सर्व चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

हेदेखील वाचा-

Back to top button