आता अंकिता लोखंडे आणि शिबानी दांडेकरमध्ये शाब्दिक घमासान पेटले! | पुढारी

आता अंकिता लोखंडे आणि शिबानी दांडेकरमध्ये शाब्दिक घमासान पेटले!

मुंबई : पुढारी ऑनलाईन

ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्तीची मैत्रीण शिवानी दांडेकर आणि सूशांतची माजी मैत्रीण अंकिता लोखंडेमध्ये चांगलेच शाब्दिक युद्ध पेटले आहे. तिने अंकिताबद्दल फक्त 2 मिनिटांची कीर्ती हवी आहे असे म्हटले होते. आता अंकितानेही शिवानी दांडेकरला प्रत्युत्तर दिले आहे. 

अंकिताने मी गेली १७ वर्षे टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री आहे. आता जेव्हा मी माझा दिवंगत मित्र सुशांतला न्यायाची मागणी करीत आहे, तेव्हा कोणीतरी म्हणत आहे की मला २ सेकंदांची स्वस्त लोकप्रियता हवी आहे. अंकिताच्या ट्विटवर सुशांतची बहीण श्वेतासिंह कीर्तीनेही पाठिंबा दर्शविला. श्वेताने तुला स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. आपल्या सर्वांना सत्य जाणून घ्यायचे आहे आणि ते आपण जाणून घेऊ.

अंकिताने इन्स्टावर पोस्ट करताना लिहिले आहे की, मी एका लहान गावातून आणि एका सामान्य कुटुंबातून आले आहे. माझ्याकडे दाखवण्यासाठी कोणतेही शिक्षण नव्हते. मी  २००४ मध्ये ‘झी सिने स्टार की खोज’ नावाच्या कार्यक्रमातून टीव्ही इंडस्ट्रीत प्रवेश केला, पण माझा खरा प्रवास २००९ मध्ये सुरू झालेल्या प्रीती रिश्ता शोपासून सुरू झाला. हा कार्यक्रम सलग ६ वर्षांपासून टीव्हीवर सर्वाधिक टीआरपी कार्यक्रमांपैकी एक आहे. प्रेक्षक माझ्यावर प्रेम ओततात. सुदैवाने मी ‘मणिकर्णिका’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि त्यानंतर मला ‘बागी 3’ मध्ये काम करण्याची संधी मिळाली.

अंकिताने पुढे लिहिले की, मी गेली १७ वर्षे टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री आहे. आता जेव्हा मी माझा दिवंगत मित्र सुशांतला न्यायासाठी पाठिंबा देण्याचा प्रयत्न करीत आहे, तेव्हा कोणीतरी म्हणाले की मी न्याय शोधत आहे कारण मला २ सेकंदाची स्वस्त लोकप्रियता हवी आहे. 

Back to top button