शेवंताचा हटके अंदाज पाहिलात का? | पुढारी

शेवंताचा हटके अंदाज पाहिलात का?

मुंबई : पुढारी ऑनलाईन

‘रात्रीस खेळ चाले २’ मालिकेतील ‘शेवंता’च्या भूमिकेमुळे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर घराघरांत पोहोचली. मालिकेत साकारलेल्या शेवंता या पात्रामुळे अपुर्वाचे चाहते डाय हार्ट फॅन बनलेत. शेवंताची एन्ट्री झाल्यानंतर मालिकेची लोकप्रियता आणखीच वाढली. पण नुकताच प्रेक्षकांच्या या आवडत्या मालिकेने निरोप घेतला. असे असले तरी आपल्या अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी शेवंता चाहत्यांपासून दूर गेलेली नाही. हटक्या अंदाजात फोटोशूट करत अपूर्वाने पुन्हा एकदा चाहत्यांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. 

आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच ग्लॅमरस अंदाजामुळे ‘रात्रीस खेळ चाले २’ मालिकेतील शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. नुकताच तिने तिचा ग्लॅमरस आणि तितकाच हटके लूकमधला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिने तिचे हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. 

dinsta

या फोटोत तिचा एरव्ही कधीही न पाहिलाला अंदाज पाहायला मिळत आहे. पांढरा रंगाचा शॉर्ट फ्रॉकमध्ये ती दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने समर्पक अशी कॅप्शनही दिली आहे. उत्तम ड्रेसिंग करणेही एक कला असल्याचे तिने म्हटले आहे. 

dinsta

dinsta

अपूर्वा नेमळेकरने रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारली होती. अत्यंत अल्पकालाविधतच पाहता या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरले होते.

dinsta

अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर ‘एकापेक्षा एक जोडीचा मामला’ या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे. तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेमुळेच मिळाली. तिने मालिकेत काम करण्यासोबतच ‘चोरीचा मामला’, ‘आलाय मोठा शहाणा’ यासारख्या नाटकांत काम केले आहे. तसेच इश्क वा लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती.

 

Back to top button