सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी एम्सचा अहवाल आला! | पुढारी

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी एम्सचा अहवाल आला!

मुंबई : पुढारी ऑनलाईन

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी एम्सने सीबीआयला अहवाल सोपवला आहे. आता सीबीआयची टीम एम्सच्या अहवालाचे विश्लेषण करत आहे. यातून सुशांतची आत्महत्या की हत्या झाली हे गुढ उकलणार आहे.

वाचा : सुशांतप्रकरणी कोणत्याच गोष्टीचा इन्कार नाही 

सीबीआयच्या हाती याआधीच काही पुरावे लागले आहेत. आता एम्सच्या अहवालानंतर सुशांतच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. हल्लीच सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबियांचे वकील विकास सिंह यांनी म्हटले होते की, सुशांत प्रकरणी होत असलेल्या तपासावरुन आम्ही समाधानी नाही. हे प्रकरण वेगळ्याच दिशेने हाताळले जात आहे. सर्व लक्ष ड्रग्ज प्रकरणाकडे आहे. मुंबई पोलिसांप्रमाणे एनसीबी सेलिब्रिटींची फॅशन परेड करत आहे. सुशांत सिंहची हत्या असून आत्महत्या झाल्याचा मुद्दा एम्सच्या डॉक्टरांनी फेटाळून लावल्याचा दावा वकील सिंह यांनी केला होता.    

वाचा : सुशांत ड्रग्ज घेत होता, त्याच्यासोबत रिलेशीनशिपमध्ये होते;आता सारानंही केला खुलासा!

सुशांत प्रकरणी अद्याप तपास पूर्ण झाला नसल्याचे सीबीआयने नुकतेच स्पष्ट केले आहे. सुशांत सिंहने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली याचा तपास सीबीआय करीत आहे. मुंबई पोलिसांकडून हा तपास सीबीआयकडे देण्यात आला आहे. 

वाचा : सोशल मीडियात दीपिकावर कमेंट्सचा पाऊस!

सुशांतसिंह प्रकरणाचा तपास करणार्‍या सीबीआयने एक महिन्यानंतर आपले निवेदन जाहीर केले असून त्यामध्ये आपण कोणत्याच गोष्टींचा इन्कार केला नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर या निवेदनावर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुशांत सिंह प्रकरणाच्या निकालासाठी आपणही उत्सुक असल्याचे सांगून सीबीआयला टोला लगावला आहे. 

 

Back to top button