अनुराग कश्यपला मुंबई पोलिसांकडून समन्स | पुढारी

अनुराग कश्यपला मुंबई पोलिसांकडून समन्स

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूड अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप करून पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यानंतर सध्या मुंबई पोलिसांनी अनुराग कश्यपला समन्स बजावले आहे. तसेच त्याला उद्या गुरूवारी (दि.१) रोजी सकाळी ११ वाजता पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

पायल घोषच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी अनुराग्य कश्यपला समन्स बजावून मुंबईतील वर्सोवा पोलिस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले आहे. याआधी पायलने अनुरागवर कारवाई झाली नाही तर मी उपोषण करणार आहे असा इशारा दिला होता.

पायल घोषचा आरोप 

याआधी पायलने एक ट्वीट करून अनुराग कश्यपने केलेला प्रकार सांगितला होता. त्यात तिने ‘अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन करून वाईट पद्धतीची वागणूक दिली आहे. कृपया या व्यक्तीविरोधात कडक कारवाई करा. असे केले तर या माणसाचे खरं रुप जगासमोर येईल. माझ्यावर ही परिस्थिती आली आहे ती इतरांवर येवू नये. मला धोका मिळालेला आहे. यामुळे माझ्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून मला सहकार्य करा.’  

पायलचे वकिल नितिन सातपुते यांनी यापूर्वी आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, ‘आम्ही अनुराग विरोधात मुंबईतील वर्सोवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यात त्याच्यावर बलात्कार, गैरवर्तन आणि चुकीचे कृत्य केल्याप्रकरणाचा आरोप केला आहे. मात्र पोलिसांनी अनुरागला अद्याप अटक केलेली नाही. 

यानंतर अनुरागने एक ट्वीट करत पायलचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. यात त्यांनी सांगितले की, ‘क्या बात है, मला गप्प करण्यासाठी इतका वेळ घेतला. काही हरकत नाही. पण मला गप्प करण्यासाठी इतके खोटे बोललात की, दुस-या महिलांनाही यात ओढले. थोडी मर्यादा ठेवा मॅडम. मी फक्त एवढेच म्हणालो की, जे काही आरोप आहेत ते सगळे निराधार आहेत.’

अधिक वाचा 

कंगना राणावतला हायकोर्टाने सुनावले खडे बोल

सुशांतप्रकरणी कोणत्याच गोष्टीचा इन्कार नाही 

Back to top button