FTII च्या अध्यक्षपदी शेखर कपूर यांची निवड | पुढारी

FTII च्या अध्यक्षपदी शेखर कपूर यांची निवड

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने मंगळवारी दिग्दर्शक शेखर कपूर यांची फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) सोसायटीचे नवीन अध्यक्ष आणि एफटीआयआय गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. शेखर यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल. शेखर एफटीआयआय सोसायटीचे सध्याचे अध्यक्ष व गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष बी.पी. सिंग यांच्यानंतर ते पदभार स्वीकारतील. फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत ही एक स्वायत्त संस्था आहे. 

शेखर कपूर यांनी दिग्दर्शित केलेली खानदान ही मालिका चांगलीच गाजली. दूरदर्शनवरून या मालिकेचे प्रसारण होत असे. त्यानंतर त्यांनी मासूम हा सिनेमा दिग्दर्शित करत हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. ‘मासूम’नंतर त्यांनी मिस्टर इंडिया हा सिनेमाही दिग्दर्शित केला. बॅंडिट क्वीन हा फूलन देवीच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाने शेखर कपूर यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवले. त्यांनी एलिझाबेथ, द फोअर फिदर्स, एलिझाबेथ द गोल्डन एज, न्यूयॉर्क आय लव्ह यू आणि पॅसेज यांसारखे सिनेमा दिग्दर्शित केले आहेत.

Back to top button