Interview : पगाराची अपेक्षा ते वीक पॉईंट सांगणे! योग्य की अयोग्य? मुद्यांमध्ये समजून घ्या | पुढारी

Interview : पगाराची अपेक्षा ते वीक पॉईंट सांगणे! योग्य की अयोग्य? मुद्यांमध्ये समजून घ्या

पुढारी ऑनलाईन डेस्क :  नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यांना प्रत्येकाला Interview चे दिव्य आव्हान पार करावे लागते. बऱ्याचवेळा पहिल्यांदा Interview साठी सामोरे जाणाऱ्यांसाठी अधिक ताण आलेला असतो. Interview ला सामोरे कसं जायचं ते प्रश्न थोडा वेगळ्या पद्धतीने आल्यास काय उत्तर द्यायचे असे बरेच प्रश्न पडलेले असता. त्यामुळे कोणत्याही मुलाखतीला जात असतानाच काय लक्षात ठेवावे? याबाबत आपल्याला लक्षात ठेवावे असे मुद्दे पुढील प्रमाणे…

१) तुमच्याबद्दल सांगा

सर्वसाधारण कोणत्याही मुलाखतीचा हा पहिला प्रश्न असतो. त्यामुळे आपल्याबद्दल काय सांगायचं याची तयारी करा. हे उत्तर १ मिनिटात पूर्ण हाेईल,  असे पाहा. यातील बराच भाग तुमचे काम आणि Achievement याच्याशी संबंधित असला पाहिजे.

२)तुमचे वीक पॉईंट सांगा

हा मुलाखतीमधील अगदी कठीण प्रश्न असतो. याचं उत्तर फार विचारपूर्वक द्यावं लागतं. उत्तर देताना तुमचा वीकपॉईंट असा सांगा की जो दुरुस्त करता येण्यासारखा आहे. समजा जर तुम्ही असं उत्तर दिलं की मी सहकाऱ्यांशी फार सॉफ्ट वागतो आणि त्याचा लोक गैरफायदा घेतात. तर हा वीकपॉईंट व्यवस्थापन ट्रेनिंगमध्ये सुधारता येऊ शकतो; पण समजा तुम्ही म्हटला की तुमचा स्वभाव तापट आहे, तर हा वीकपॉईंट दुरुस्त करणं फार कठीण जाईल. दुसरं उदाहरण असं म्हणजे वर्क आणि फॅमिली असं बॅलन्स करताना मला थोडं कठीण जातं, असं जर तुमचं उत्तर असेल तर हाही वीक पॉईंट सुधारण्यासारखा आहे.

पण या प्रश्नाचं उत्तर मला माहिती नाही, माझ्यात कोणताच वीकपॉईंट कोणताच नाही, असं दिलं तर ती मात्र चूक ठरेल. यांचं सर्वांत मोठ कारण म्हणजे Self Realization हा महत्त्वाचा भाग मानला जातो.

३)कपडे आणि दिसणं

मुलाखतीमध्ये आपण नीट दिसतो का याबद्दल आपल्याच मनात एक प्रकारची भीती असते. त्यामुळे स्वच्छ, इस्त्री केलेले कपडे, केसं विंचरलेले असावेत याकडे लक्ष द्या. मुलाखतीत कपडे फॉर्मल असू देत. जास्त दागिने परिधान करू नका.

४) मुलाखतीची तयारी

 सर्वसाधारण जॉब रोल, CV मध्ये आपण दिलेली माहिती, यातून मुलाखतीचे प्रश्न विचारले जातात. काही प्रश्नांची उत्तर तुम्हाला येणारही नाहीत; पण याचा अर्थ मुलाखतीची तयारी करू नये असं होत नाही. सर्वच उत्तरं यावीत अशी अपेक्षाही नसते. त्यामुळे मुलाखतीची तयारी नक्की करा. शक्य असेल तर तुमच्या ओळखीचे शिक्षक, चांगल्या पदावरील मित्र यांना तुमची मॉक मुलाखत घ्यायला सांगा. कंपनीची माहिती, कामाची माहिती, मुलाखत कोण घेत आहेत, यांची माहिती द्या.

५) पगाराची अपेक्षा

पगाराची अपेक्षा व्यक्त करणं यात कोणतीही चूक नाही. तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केला आहे, त्यासाठी तुमच्या शहरात आणि संबंधित किती पगार देतात याचा अंदाज घेऊन ठेवा. तसेच तुमचा आताचा पगार किती आहे, याचा विचार करून पगाराची अपेक्षा सांगा.

६) तुमचे काही प्रश्न आहेत का?

हाही प्रश्न मुलाखतीच्या शेवटी विचारला जाऊ शकतो. काहीवेळा job description आणि प्रत्यक्षातील कामाचं setting यात फरक असतो. त्यामुळे प्रत्यक्षातील कामाचं स्वरूप विचारू शकता.

७) सध्याची नोकरी का सोडत आहात?

याचं उत्तर देताना आता जिथं काम करत आहात, त्या कंपनीबद्दल वाईट मत व्यक्त करू नका. तसेच तुमच्या वरिष्ठांबद्दलही चुकीची टिप्पणं करू नका. जर काही कारणाने तुम्हाला कामावरून कमी केलं असेल, मंदीमुळे नोकरी गमावली असेल तर तसे स्पष्ट सांगणं यात काही चूक नाही. कारण बऱ्याच वेळा मुलाखत घेणाऱ्यांनी सध्याची मार्केट स्थिती नीट माहिती असते.

हे वाचलं का ? 

पहा व्‍हिडीओ : उमेश कामत आणि प्रिया बापटशी गप्पा 

 

 

Back to top button