अनुष्काचे ‘डंगरी’तील बेबी बंप व्हायरल! | पुढारी

अनुष्काचे ‘डंगरी’तील बेबी बंप व्हायरल!

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा पुढील वर्षी जानेवारीत आपल्या बाळाला जन्म देणार आहे. ती सध्या IPL मुळे आपला पती व रॉयल चॅलेंजर्ज बंगळूर संघाचा कर्णधार विराट कोहली सोबत दुबईत आहे. मात्र, असे असले तरी अनुष्का सोशल मीडियामध्ये फारच ॲक्टिव आहे. ती दुबईतून आपले खास फोटो चाहत्यांसाठी सोशल मीडियात शेअर कर आहे. या फोटोंना चाहत्यांची तसेच सेलिब्रेटींची चांगलीच पसंती मिळत आहे. 

अनुष्काने नुकताच आपला एक क्यूट फोटो शेअर केला आहे. ज्यात ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. या व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये अनुष्का शर्माने डगरी परिधान केली आहे. आई होण्याचा आनंद ती लूटत आहे. या फोटोत अनुष्का खूप खूश दिसत आहे. तिच्या चेह-यावरील हास्य पाहून आपल्याला याचा अंदाज नक्कीच येईल. 

आपला फोटो शेअर करत अनुष्काने कॅप्शनमध्ये Pocketful of sunshine असं लिहिलंय. यावर सेलेब्सपासून चाहत्यांनी अकेनजण कमेंट देत आहेत. तब्बल २६.५ लाखाहून अधिक जणांनी हा फोटो लाईक केला आहे.

Back to top button