कंगना हाजिर हो!; मुंबई पोलिसांकडून समन्स | पुढारी

कंगना हाजिर हो!; मुंबई पोलिसांकडून समन्स

मुंबई: पुढारी ऑनलाईन

देशद्रोहाच्या आरोपांप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांना मुंबई पोलिसांकडून नोटीस धाडण्यात आली आहे. मुबंई पोलिसांनी दोघींना चौकशीसाठी बोलावले आहे. त्यामुळे नेहमी वादाच्या भोवऱ्यात असणाऱ्या या बहिणींच्या आडचणीत वाढ झाली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान,  कंगनाने पोलिसांनी बजावलेल्या समन्सला ट्विट करत उत्तर दिले आहे.

वाचा: योगायोग की विरोध? आजपासून अजित पवार होम क्वारंटाईन; नाथाभाऊंचा उद्या राष्ट्रवादीत प्रवेश!

वांद्रे न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी कंगना रणौत हिच्यासह तिच्या बहिणीविरोधात देश गुन्हा दाखल केला आहे. कंगना आणि तिच्या बहिणीविरूद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम २९५ ((अ) १५३  (अ) आणि १२४ (अ) अंतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला. कास्टिंग दिग्दर्शक साहिल अशरफ सैयद यांच्या तक्रारीनंतर वांद्रे कोर्टाने कंगना आणि रंगोलीविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 

वाचा: म्यानमार ते मुंबई; हेलनचा हृदयद्रावक प्रवास!

कंगना सोशल मीडिया आणि मुलाखतींच्या माध्यमातून हिंदू आणि मुस्लीम कलाकारांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप साहील अशरफ सैयद यांनी केला आहे. अभिनेत्री कंगना तिच्या भावाच्या लग्नात आनंद साजरा करत असतानाच तिला ही नोटीस मिळाली आहे. तिने मुंबई पोलिसांना ‘महाराष्ट्राचे पप्पू’ म्हटले आहे. कंगनाने ट्विटरच्या माध्यमातून पोलिसांना उत्तर दिले आहे. 

वाचा: पुरूषांच्या तुलनेत महिलांना स्वस्तात कर्ज; ‘अशी’ आहे पीएम आवास योजना!

‘वेडसर झालेली पेंगविन सेना, महाराष्ट्राच्या पप्पूनो.. खूप आठवण येते आहे क-क-क-क-क कंगनाची, काही हरकत नाही लवकरच परत येईन.’ असे कंगनाने ट्विटमध्ये म्हटले आहे. 

Back to top button