ज्येष्ठ बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी यांचं निधन | पुढारी

ज्येष्ठ बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी यांचं निधन

कोलकाता : पुढारी ऑनलाईन 

ज्येष्ठ बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी (सौमित्र चटोपाध्याय) यांचं निधन झालं आहे. रविवारी सव्वाबारा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिनेमा आणि रंगमंचावरचे ‘दिग्गज’ म्हणून सौमित्र चटर्जी यांची ओळख होती. 

सौमित्र चटर्जी यांच्यावर कोलकत्याच्या ‘बेले व्यू क्लिनिक’ या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. सौमित्र यांना कोरोना संक्रमणामुळे ६ ऑक्टोबर रोजी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर १४ ऑक्टोबर रोजी त्यांची कोरोना टॅस्ट निगेटीव्ह आली होती. मात्र, त्यांना श्वासोच्छवासात अडथळे जाणवू लागले होते. तसेच त्यांचं मूत्रपिंडही निकामी झालं होतं. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीत आणखीनच बिघाड झाला. डॉक्टरांनी त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टमवर ठेवलं होतं. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

Back to top button