प्रेग्नेंट अनुष्काचं खास फोटोशूट, विराट म्हणाला… | पुढारी

प्रेग्नेंट अनुष्काचं खास फोटोशूट, विराट म्हणाला...

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा जानेवारी २०२१ मध्ये बाळाला जन्म देणार आहे. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेग्नेंसीदरम्यानचे फोटोदेखाल शेअर करताना दिसली आहे. आता तिने व्होग मॅगझिनसाठी अनुष्का शर्माने कव्हर फोटोशूट केलं आहे. सोशल मीडियावर अनुष्काने बेबी बंप फ्लॉन्ट करत फोटोशूट केला आहे. हे फोटो व्हायरल होत आहेत. फोटोशूटमध्ये अनुष्काच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसी ग्लो दिसत असून यावर विराट कोहलीची प्रतिक्रियादेखील येत आहे.

अनुष्काचा पती विराटने अनुष्काचे भरभरून कौतुक केले आहे. त्याने कमेंट करताना लिहिले आहे, “खुपचं सुंदर”. कव्हर पेज शेअर करताना अनुष्का शर्माने लिहिलं आहे, ‘आपल्यासाठी आणि संपूर्ण आयुष्यासाठी हे कॅप्चर केलं.’ 

या फोटोशूटदरम्यान अनुष्काने प्रेग्नेंसी विषयी म्हटले की, मी चित्रपट ‘बुलबुल’च्या प्रमोशनमध्ये बिझी होते आणि झूमकॉलवेळी मला अचानक समस्या झाली. मला अस्वस्थ वाटत होते. त्यानंतर मी तत्काळ आपला व्हिडिओ ऑफ केला होता. आणि आपला भाऊ कर्णेश शर्माला मेसेज केला होता. त्यावेळी तोदेखील कॉलवर होता. जर मी सेट किंवा स्टुडिओमध्ये असते, सर्वांना समजलं असतं.’ 

Back to top button