कियाराच्या मालदिवच्या बीचवर बॅकलेस ड्रेसमध्ये HOT अदा! (photos)  | पुढारी

कियाराच्या मालदिवच्या बीचवर बॅकलेस ड्रेसमध्ये HOT अदा! (photos) 

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी सध्या मालदीवमध्ये आहे. न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी तिच्यासोबत सिध्दार्थ मल्होत्रादेखील मालदीवमध्ये आहे. ती सिद्धार्थ सोबत येथे व्हेकेशन एन्जॉय करायला येत आहे. सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असणाऱ्या कियाराने इन्स्टाग्रामवर एक सुंदर फोटो शेअर केला आहे.

यामध्ये ती बॅकलेस ड्रेस घालून समुद्राकडे पाहताना दिसत आहे. या फोटोमध्ये तिच्या हातात एक हॅटदेखील दिसत आहे. काही मिनिटांतच या फोटोला लाखोंच्या संख्येने लाईक्स आणि शेअर मिळाले आहेत.

फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये कियाराने लिहिलंय, “तुझ्याकडे पाहत आहे वर्ष २०२१.” इतरांप्रमाणे कियारानेदेखील नवाय नव्या वर्षात अपेक्षा ठेवल्या आहेत. आता पाहावं लागेल की, नवं वर्ष बॉलिवूडसाठी कसं असेल. 

अधिक वाचा – प्रेग्नेंट अनुष्का शर्माचं खास फोटोशूट, विराट कोहली म्हणाला…

अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी देखील न्यू ईअर सेलिब्रेट करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गेले आहेत. रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, रणबीर कपूर, नीतू कपूर, आलिया भट्ट, अयान मुखर्जी जयपूरमध्ये गेले आहेत तर कियारा आडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रासह अनन्या पांडे आणि ईशान खट्टर सध्या न्यू ईअर सेलिब्रेट करण्यासाठी मालदिवला गेले आहेत. 

Back to top button